राष्ट्रपतींनी केली भगत सिंग कोश्यारी यांची राज्यपाल पदी नियुक्ती

महाराष्ट्र
 01 Sep 2019  706

राष्ट्रपतींनी केली महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी भगत सिंग कोश्यारी यांची नियुक्ती 

* लोकदूत वेबन्यूज़ चे वृत्त खरे ठरले 

लोकदूत वेबन्यूज़ टीम 

मुंबई 1 सप्टेम्बर 

 

लोकदूत वेबन्यूज पोर्टल ने दिलेले राज्यपाल नियुक्तीचे वृत्त अखेर खरे ठरले आहे.  महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून भाजपा उत्तराखंडचे जेष्ठ नेते माजी मुख्यमंत्री भगत सिंग कोश्यारी यांची  राष्ट्रपती  राम नाथ कोविंद यांनी नियुक्ती जाहिर केली आहे. या सोबत 4 राज्याच्या  नव्या  राज्यपाल पदावर नियुक्ती जाहीर केल्या आहे.

    हिमाचल प्रदेश चे राज्यपाल कलराज मिश्र यांना राजस्थान च्या राज्यपाल पदी नियुक्त केले असून हिमाचल प्रदेश नवे राज्यपाल म्हणून बंडारू दत्तात्रेय लक्षमण यांना नियुक्त केले आहे. केरळचे राज्यपाल म्हणून आरिफ मोहम्मद खान तर तेलंगाना राज्याच्या राज्यपाल पदी डॉ.तमिलीसाई सुंदरारजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

     महाराष्ट्राच्या   राज्यपाल पदावर नियुक्त झालेले  भगत सिंग कोश्यारी यांचा जन्म 17 जून 1942 रोजी झाला असून उत्तराखंड राज्याचे पाहिले भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी  जबाबदारी पार पाडली आहे. 30ऑक्टोबर 2001 ते 1मार्च 2002 या कालावधीत उत्तराखंड राज्याचे दूसरे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. उत्तराखंड विधानसभेचे विरोधी पक्षनेते, राज्यसभा खासदार , लोकसभा खासदार म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे.