शरद पवार यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

विधिमंडळ
 11 Mar 2020  635
राज्यसभा निवडणूक: भाजपच्या तिसऱ्या उमेदवाराचा सस्पेन्स कायम
# शरद पवार यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

लोकदूत वेबटीम
मुंब ११ मार्च
राज्यसभेच्या सात जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अर्ज दाखल केला असला तरी फौजिया खान यांचा र्ज उद्या आघाडीतील घटकपक्षांच्या बैठकीनंतर भरला जाण्याची शक्यता आहे. भाजपच्या अधिकृत उमेदवारांची घोषणा झाली नसली तरी भाजपकडून रामदास आठवले व उदयनराजे भोसले यांची नावे निश्चित मानली जात असली तरी तिसरा उमेदवार कोण, याबद्दलचे रहस्य कायम असून या जागेवर अद्याप उमेदवार निश्चित होणारहे असे सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्राच्या कोट्यातून निवडून द्यावयाच्या सात जागांसाठी येत्या २६ मार्च रोजी निवडणूक होत आहे. राष्ट्रवादीकडून शरद पवार व फौजिया खान आज विधान भवनात अर्ज दाखल करणार आहेत. मात्र, भाजप, शिवसेना व काँग्रेसने अद्याप आपल्या उमेदवारांची घोषणा केलेली नाही. त्यातही भाजपच्या उमेदवारा विषयी विशेष उत्सुकता आहे. भाजपकडून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. मात्र, तिसऱ्या नावावर अद्याप एकमत होऊ शकले नाही. या जागेसाठी एकनाथ खडसे यांच्या नावाचा आग्रह राज्य कार्यकारिणीने धरला आहे. पक्षाच्या संसदीय बोर्डाकडे त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आल्याचं सूत्रांकडून समजते. अर्थात, खडसे यांनी दिल्लीत जाण्यास होकार दर्शवला आहे का, याबाबत अद्याप कळू शकले नाही. याशिवाय, शायना एन. सी. यांचेही नाव राज्यसभेच्या शर्यतीत आहे. या संदर्भात पुण्यातील भाजपचे नेते संजय काकडे यांनी काही दिवसांपूर्वी राज्यसभेवर दावा केला होता. उदयनराजे यांच्या नावाला त्यांनी विरोध दर्शवला होता. पक्षाने त्यांना संधी न दिल्यास ते काय भूमिका घेतात, हेही पाहावे लागणार आहे.