‘ऑपरेशन लोटस’ नव्हे हा तर कोरोना व्हायरस!

विधिमंडळ
 04 Mar 2020  640

ऑपरेशन लोटसनव्हे हा तर कोरोना व्हायरस!

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे भाजपवर टीकास्त्र

लोकंदूत वेबटीम

मुंबई ४ मार्च

भाजपचे ऑपरेशन लोटसम्हणजे एक प्रकारचा कोरोना व्हायरस असून, त्यावर अॅंटीबायोटिक शोधण्याचा आमचा प्रयत्न सुरू असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

मध्यप्रदेशातील काँग्रेसचे सरकार अस्थिर करण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रयत्नांबाबत बुधवारी विधीमंडळ परिसरात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी चव्हाण म्हणाले की, ‘ऑपरेशन लोटस’ हे भाजपसाठी नेहमीचेच झाले आहे. भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांमधील आमदार फोडून तेथील सरकारे पाडण्याचा प्रयत्न भाजप करीत असते. पण लोकशाहीला मानणारे राजकीय पक्ष भाजपचे हे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाहीत. राज्या-राज्यातील सरकारे मग ती कोणत्याही पक्षाची असोत, लोकशाही मार्गानेच चालली पाहिजेत, असे सांगून अशोक चव्हाण यांनी कमलनाथ सक्षम मुख्यमंत्री असून, मध्यप्रदेशातील काँग्रेसच्या सरकारला कोणताही धोका नसल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला.