कुख्यात गुंड रवी पुजारीला आमच्या ताब्यात द्या

विधिमंडळ
 24 Feb 2020  651

कुख्यात गुंड रवी पुजारीला आमच्या ताब्यात द्या 

# राज्याच्या गृहमंत्रालयाचे कर्नाटक सरकारला पत्र 

मुंबई २४ फेब्रुवारी 

राज्यासह देशभरात मोठ्याप्रमाणात खंडणी आणि खुनाचे गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुंड रवी पुजारीला दक्षिण आफ्रिकेतून कर्नाटक पोलिसांनी अटक करून आणले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही गंभीर गुन्हे रवी पुजारीवर असून आम्हालाही त्याचा ताबा द्या अशी मागणी राज्य सरकारांनी कर्नाटक सरकारला केली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनीं दिली. कर्नाटक पोलिसांचा तपास पूर्ण होताच महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात पुजारीला देणार असल्याचेही यावेळी गृहमंत्र्यांनी सांगितले. 

       दिशा कायद्याप्रमाणे राज्यातही कायदा करण्यासाठी राज्य सरकारने ठरवले आहे. त्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आंध्र प्रदेश दौरा करून आपले आहे. त्या राज्यात केलेल्या दिशा कायद्याची माहिती देतांना गृहमंत्र्यांनी सांगितले की, ज्या प्रकरणात आरोपी माहित आहे. त्या प्रकरणात सात दिवसात चौकशी करून पुढील १५ दिवसात ट्रायल घेऊन जलदगती न्यायालयात निकाल येणे अशी प्रक्रिया असल्याचे ना. देशमुख यांनी सांगितले. या कायद्यामुळे आंध्र प्रदेश सरकारने महिला वकील,न्यायमूर्ती,आणि वैद्यनानिक प्रयोगशाळा यांची संख्ख्या वाढवली असून केवळ महिला असलेले दिशा पोलीस स्थानकाची निर्माण करण्यात आल्याचे यावेळी सांगितले. त्याच बरोबर असा प्रसंग घडत असतांना त्या महिलेने त्यांच्या हातात असलेला मोबाईल तीन वेळा हलवला असता,किंवा पॅनिक बटन दाबले असता जवळील पोलीस स्थानकात तात्काळ माहित होणार आहे. शिवाय आपोआप रेकॉर्डिंग व व्हिडीओ रेकॉर्डिंग केले जात असलेले मोबाईल चे ऍप तयार केले आहे. यासाठी त्यांनी जवळपास ८५ कोटी रुपये खर्च केले असून याच धर्तीवर महाराष्ट्रातही नव्याने कायदा आणि  ऍप तयार कारण्यासंदर्भांत सूचना केल्या आहे. नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी टायर करून फेब्रुवारी अखेर याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीं सांगितले. 

     एखाद्या महिलेने लेखी तक्रार केली नसल्यास त्याची व्हिडीओग्राफी च्या माध्यमातून तक्रार दाखल करण्याचा पर्यायही त्यांनी ठेवला असल्याचे यावेळी सांगितले. आंध्र प्रदेश सरकारने सदर कायदा टायर करून केंद्र सरकारला मांजूरीसाठी पाठविला असल्याचे यावेळी ना. देशमुख म्हणाले. 

चौकात..... महिला मंत्री,आमदार यांची आवाज विधान भवनात बैठक 

             दिशाला कायद्या प्रमाणे राज्यातही नवा कायदा आणण्य्साठी राज्य गृह विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी या कायद्यात आणखी काय काय नव्याने समावेश करायचा यासाठी राज्य मंत्री मंडळातील महिला मंत्री, सभागृहातील महिला आमदार,विधानसभा अध्यक्ष,सभापती यांची विधान भवनात मंगळवारी बैठक होणार असून यात सखोल चर्चा केली जाणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. 

फोन टॅपिंग समितीची संख्या वाढवणार

तत्कालीन राज्य सरकारने राज्यातील काही नेत्यांचे फोन टॅपिंग केले असल्याच्या संशयावरून याचिओ चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने दोन सदस्य समिती नेमली आहे.मात्र याबाबत कुठलाही शासन  निर्णय जाहीर केला नसल्याचे विचारले असता,या समितीत आणखी काही अधिकाऱ्यांच्या समावेश करणार असल्याचे सांगत लवकरच शासन आदेश जाहीर केले जाणार असल्याचे यावेळी नाव. अनिल देशमुख यांनी सांगितले. 

हिंगणघाट प्रकरणी दोन दिवसात खटला दाखल करणार 

      हिंगणघाट येथे घडलेल्या घटनेवर न्यायालयात आरोपी विरुद्ध येत्या दोन तीन दिवसात खटला दाखल करणार असल्याचे यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.