भूषण गगरानी आणि सौरभ राव यांना मिळाला पूर्ण पदभार

मंत्रालय
 05 Aug 2020  845

लोकदूत वेबटीम 

मुंबई 5 ऑगस्ट 

गेल्या 5 6 महिन्यांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आलेले प्रधान सचिव भूषण गगरानी यांना अखेर  नियुक्ती मिळाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भूषण गगरानी यांना नगर विकास विभाग एक या विभागाच्या प्रधान सचिव पदाची सूत्र सोपवली असून पुणे विभागीय आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार संभाळत असलेले विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांच्याकडे पुणे विभागीय आयुक्त पदाचा पूर्ण पदभार दिला आहे.

  प्रविण परदेशी यांची मंगळवारी संयुक्त राष्ट्र संघात समन्वयक म्हणून नियुक्ती झाल्याने नगरविकास विभागाचा अतिरिक्त पदभार गगरानीकडे सोपवण्यात आला होता. तर. 31 जुलै रोजी पुणे विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसकर निवृत्त झाल्याने या पदाची अतिरिक्त सूत्र सौरभ राव यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना या विभागाची पूर्ण जबाबदारी सोपवली आहे. सौरभ राव यांनी पुणे जिल्हाधिकारी,पुणे मनपा आयुक्त म्हणून काम केले आहे.