सर्व विभागाचे समतोल साधणारा अर्थसंकल्प -उपकमुख्यमंत्री

विधिमंडळ
 06 Mar 2020  645

सर्व विभागाचा समतोल राखलेला अर्थसंकल्प - उपमुख्यमंत्री

# पुढील पाच वर्षात ५ लाख शेतकऱ्यांना सौर उर्जेवरील कृषी पंप देण्याचा संकल्प

लोकदूत वेबटीम 

मुंबई ६ मार्च

राज्याच्या अर्थसंकल्पात सर्व विभागाचा समतोल राखूनच अर्थसंकल्प मांडला आहे. मात्र विरोधकांचे कामच अर्थसंकल्पावर टीका करणारा असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली.

शिक्षण,शेती,आरोग्य,पर्यावरण आणि पर्यटनासह उद्योगांसाठीही आवश्यक त्या सर्व बाबी अधोरेखित केल्या आहे. मागील सरकारने पीक कर्जमाफी करून ३ वर्ष पैसे देण्यासाठी लावले. सोबत तब्बल २६ वेळा विविध बदल करून विविध शासन निर्णय निर्गमित केले. मात्र आम्ही एकाच निर्णय घेतला असून एकाच शासन निर्णयात १० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहे. मार्च अखेरीस पुन्हा पाच हजार कोटी रुपये देण्यात येणार असून नव्या अर्थसंकल्पात तब्बल ७ हजार कोटी रुपयांची ताटातुड केली आहे. सदर कर्ज माफ केल्या नंतर नव्याने शेतकऱ्यांना कर्ज देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सर्व राष्ट्रीयकृत बँकांना आदेश दिले आहे. शिवाय शिवाय यासाठी मुख्यमंत्र्यांसह आम्ही दिल्लीत जाऊन केंद्रालाही याबाबत व बँकांना शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यासाठी पैशाचे नव्हे तर शेतकऱ्यांचे टार्गेट द्यावे अशी विनंती करणार असून एकही शेतकरी कर्जापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

शेतीला वीज काही प्रमाणात दिली जाते. [परंतु दिवस वीज देण्यासाठी शेतकऱ्यांचे सर्व कृषी पंप सौर उर्जेवर असल्यास त्यांना बिलही भरण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे पुढील पाच वर्षात पाच लाख कृषी पंप देणार असल्याची ग्वाही यावेळी दिली. राज्यात बेरोजगारी वाढत आहे. त्या रोखण्यासाठी आणि राज्यातील कंपन्यात आवश्यक असलेले कुशल रोजगार निर्माण करण्यासाठी संबंधित कामाचे प्रशिक्षण देऊन तरुण तरुणींना रोजगारासाठी तयार करणार असल्याचे यावेळी ना. अजित पवार म्हणाले. शिवाय स्थानिक तरुणांना रोजगारासाठी असलेल्या कायद्यातही बदल करणार असल्याचे सांगत ग्रामीण भागात नव्याने सडक योजना राबविली जाणार असल्याचे यावेळी सांगितले.

पेट्रोल आणि डिझेल वर १ रुपया सेस कर लावला असून वर्षातून १५०० कोटी रुपये राज्य सरकारला मिळणार आहे. मात्र हा निधी पर्यावरण जातानासाठीच वापरला जाणार असून भावी पिढीसाठी जनता १ रुपया सेस देइओल असा विश्वास यावेळी अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला. महिला अत्याचारावर योग्य तपास व्हावा यासाठी सर्व जिल्हात केवळ महिलांचा समावेश असलेले पोलीस ठाणे निर्माण करण्यात येणार असल्याचे सांगत मराठवाड्यात आवश्यक असलेल्या वाटर पवार ग्रीड साठी मोठा निधी दिला आहे. यामुळे शेजारील चार जिल्यांना याचा फायदा होणार आहे.