सावरकरांचा ठेका एकट्या भाजप ने घेतला का - मुख्यमंत्री

विधिमंडळ
 23 Feb 2020  672

 

लोकदूत वेबटीम 

मुंबई 23 फेब्रुवारी 

महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी उद्या सोमवारी जाहीर करण्यात येणार आहे.येत्या तीन महिन्यात ही कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल असे सांगतानाच कर्जमाफीवरून त्यांनी विरोधकांना टोलाही लगावला.सावरकरांचा ठेका एकट्या भाजपाने घेतला असे समजू नये असा टोला लगावतानाच कायदा सुव्यवस्थेवरून त्यांनी भाजपाचा समाचार घेतला.भाजपाच्या राज्यात बुडाखाली काय जळते हे भाजपाने आधी पहावे असाही सल्ला त्यांनी दिला.

अर्थसंकल्पीयअधिवेशनाच्या पूर्व संध्येला आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतक-यांसाठी महत्वपूर्ण घोषणा केली.महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी उद्या सोमवारी जाहीर करण्यात येणार आहे.येत्या तीन महिन्यात ही कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल असे सांगतानाच कर्जमाफीवरून त्यांनी विरोधकांना टोलाही लगावला.या पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते उपस्थित होते.यावेळी विरोधकांनी केलेल्या टीकेचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाचार घेतला तर राज्यातील कायदा सुव्यवस्था आणि दिशा कायद्यासंदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माहिती दिली.महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी उद्या सोमवारी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.येत्या तीन महिन्यात ही कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.फडणवीस सरकारची कर्जमाफीची योजना अजुनही सुरु आहे,त्यामुळे सर्व गोष्टी पूर्ण करुनच पुढे जाऊ, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.आमचे सरकार विरोधकांना नाही तर जनतेला बांधिल आहे.सरकारने दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याचे काम सुरू केलं आहे. हे विरोधकांनी हे डोळे उघडे ठेवून बघावे, त्यांचे वय ६ ते १८ वर्ष असते तर त्यांनाही चष्मे दिले असते असा टोलाही त्यांनी लगावला.

विरोधकांनी चांगल्या विरोधी पक्षाची भूमिका घ्यावी, वारेमाप तक्रारी व आरोप करणे चूक आहेअसा शब्दात भजापाला फटकारतानाच सीएए आणि एनपीआर विषयी आम्ही आपसात नक्कीच चर्चा केलेली आहे आणि तीन पक्षांच्या प्रत्येकी तीन मंत्र्यांची समिती एनपीआरमधील प्रश्नांचा अभ्यास करून भूमिका निश्चित करेल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.या वेळी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी तूर खरेदी बाबतचे विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. ६५ हजार क्विंटल तूरडाळीची खरेदी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. धानाची खरेदी फडणवीस सरकारच्याच पद्धतीने ऑनलाईन सुरु आहे असेही ते म्हणाले. भाजपाची राज्ये आहेत तेथे बुडाखाली काय जळते ते आधी पहा असा सल्लाही ठाकरेंनी दिला.

ठाकरे म्हणाले की, आमचे सरकार स्थिरावले आहे, काम करते आहे हेच विरोधकांच्या पचनी पडत नाही. खरे कोटे वारेमाप रोप केले तरी आमची बांधिलकी जनतेशी आहे व ती आम्ही निभावतो आहोत. नागपूरला आम्ही घोषणा केली होती, की दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करू त्याची पहिली यादी आम्ही उद्या जाहीर करतो आहोत. शिवभोजन योजना सुरु केली. ती हळु हळु वाढवत गेलो. अमाप काहीतरी जाहीर करायचे व नंतर सोडून द्यायचे हे आधीच्या सरकारचे धोरण होते अशीही टीका त्यांनी केली. शिवभोजन योजना चांगली चालली आहे. संख्या व वेळ यात तसेच केंद्रांमध्ये वाढ करत चाललो आहोत. मार्च एप्रिल मे या तीन महिन्यात कर्जमाफी पूर्ण होईल हे आम्ही जाहीर केले, त्याच कालावधीत ते पूर्ण करू. संपूर्ण तयारी झाल्या नंतरच त्यात हात घालायचे आम्ही ठरवले होते असेही ते म्हणालेे. सरकारने केलेल्या कामांची यादी सांगताना ठाकरे म्हणाले की पाच दिवसांचा आठवडा आम्ही जाहीर केला.

शेतकरी कर्जमाफी योजनेच्या पहिल्या यादीत प्रत्येत जिल्हयातील दोन गावांची यादी जाहीर होईल. त्यातील अडचणी दूर केल्या जातील.नंतर पुढची यादी २८ तारखेला जाहीर होईल. ३५ लाख कर्जखात्यांची माहिती सरकारकडे आली आहे. गिरणी कामगारांच्या घरांची पहिली यादी १ मार्च रोजी जाहीर होईल टप्प्या टप्यांने त्यांची घरेही दिली जातील.शेतकऱ्यांची माहिती तपासून त्यतील योजनेत बसणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये सरकार पैसे जमा करेल असे पवार यांनी स्पष्ट केले. एनपीआरमध्ये वरकरणी काही दिसत नसले तरी त्यातील काही अडचणीचे प्रश्न असतील. ते तपासण्यासाठी तीन मंत्र्यांची समिती नेमून माहिती घेऊन धोरण ठरवू असेही ठाकरे म्हणाले. सावरकारंविषीयी सभागृहात विषय निघेल तेंव्हा मी बोलेनच, पण जेंव्हा अंदमानातील पाटी काढली गेली तेंव्हा तिकडे राज्यपाल असणाऱ्या रामभाऊ कापसे यांना राजीनामा देण्यास भाजपने सांगितले नव्हते. सावरकरांचा ठेका एकट्या भाजपाने घेतला असे समजू नये. तुम्ही म्हणाल तेच हिंदुत्व हे मी मानत नाही.जेएनयुमध्ये जे अतिरेकी घुसले होते त्यांना एकालाही तुमच्या केंद्रीय गृहखात्याने पकडले नाही. भाजपाच्या राज्यात बुडाखाली काय जळते हे भाजपाने आधी पहावे असाही सल्ला ठाकरेंनी दिला.