9 आईएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मंत्रालय
 13 Feb 2020  1268

प्रधान सचिव मनिषा पाटणकर यांच्याकडे राजशिष्टाचार

* मुख्यमंत्र्यांनी केल्या 9 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या 

तभा वृत्तसेवा 

मुंबई 13 फेब्रुवारी 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांसह राज्यातील 9 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहे. यात राज्याच्या नगर विकास 2 या पदावर प्रधान सचिव म्हणून सर्वाधिक काळ नियुक्त असलेल्या मनिषा पाटणकर यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्याकडे आता प्रधान सचिव राज्यशिष्टाचार विभागाची जबाबदारी राहणार असून यवतमाळ जिल्हाधिकारी म्हणून लातूर मनपा आयुक्त एम देवेंद्र सिंह यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य चित्रपट रंगभूमी व सांस्कृतिक विभागाच्या संचालिका जयश्री भोज यांची बृहन्मुंबई मनपा अतिरिक्त आयुक्त या ठिकाणी, अन्न पुरवठा प्रधान सचिव महेश पाठक यांची प्रधान सचिव नगर विकास 2, साईबाबा विश्वस्त व्यवस्था शिर्डी देवस्थानचे कार्यकारी अधिकारी डी एम मुगळीकर यांना परभणी जिल्हाधिकारी पदी,डॉ विजय सूर्यवंशी यांना कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त,राज्य वखार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांना पशुसंवर्धन आयुक्त,तर उप सचिव सामान्य प्रशासन विभाग येथील चंद्रकांत डांगे यांना आयुक्त मीरा भाईंदर मनपा आयुक्त परभणी जिल्हाधिकारी पी सीवा शंकर यांची नांदेड जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती केली आहे.