4 ऑक्टोबर पासून शाळा सुरु

मंत्रालय
 24 Sep 2021  472

* शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

 लोकदूत वेबटीम 

मुंबई 25 सप्टेंबर 


कोरोनाने गेली दिड वर्ष बंद असलेली शाळेची घंटा आता खणखणणार आहे. राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संमती दिली असून ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी तर शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग भरवण्यात येणर आहेत, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी प्रसिद्धी माध्यमांना सांगतिले.

मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, पाल्यांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांची संमती आवश्यक असेल. मात्र उपस्थिती बंधनकारक नसेल. शिक्षक- शिक्षकेतर कर्मचा-यांनी लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या असाव्यात. शारिरिक अंतरासह कोरोना सुरक्षेच्या उपाययोजना शाळांमध्ये करण्यात येतील.

त्या पुढे म्हणाल्या, जुलै महिन्यातच आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे निर्णय लांबणीवर टाकण्यात आला होता. परवाच्या मंत्रीमंडळ बैठकीत कोरोना स्थितीवर चर्चा झाली. तिसऱ्या लाटेची शक्यता धूसर झाल्याने मुख्यमंत्र्यांनी शाळा उघडण्यास संमती दिल्याचे गायकवाड म्हणाल्या.

विद्यार्थ्यांना शाळेत हजर राहण्याची सक्ती करण्यात येणार नाही. पालकांची परवानगी घेणे आवश्यक असणार आहे. ग्रामीण भागात शाळा सुरू करण्याचे अधिकार जिल्हाधिका-यांना तर शहरी भागात महापालिका आयुक्तांना असतील. कृती दलाने सुनिश्चित कार्यपद्धती  तयार केली असून ती लवकरच जारी केली जाईल, असे गायकवाड यांनी सांगतिले.

विद्यार्थ्यांना गणवेशाची सक्ती न नसेल. शाळा प्रत्यक्ष चालु झाल्या तरी आॅनलाईन क्लासेस चालुच राहतील. परिक्षांसाठी शाळांतील उपस्थितीची अट असणार नाही. विद्यार्थ्यांनी पैदल किंवा पालकांच्या वाहनातून यावे. शाळांशी आरोग्य केंद्रे संलग्नी असणार आहेत, अशी माहिती मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
-------------------