बहुचर्चित 162 तहसीलदार,उप जिल्हाधिकारी,अप्पर जिलाधिकाऱ्यांच्या बदल्या

मंत्रालय
 17 Sep 2021  483

* महसूल विभागाला मुहूर्त मिळाला 

लोकदूत वेबटीम 

मुंबई 17 सप्टेंबर 

अखेर महसूल विभागातील तब्बल 162 अधिकाऱ्यांचे विनंती बदली आदेश शुक्रवारी रात्री उशिरा निर्गमित झाले आहे.यात तहसीलदार,उपजिल्हाधिकारी आणि अप्पर जिलगाधिकारी यांचा समावेश आहे.

कोरोनामुळे राज्यातील नियमित प्रक्रियेत होणाऱ्या सरसकट बदल्यांना 25 टक्क्यांचा नियम सामान्य प्रशासन विभागाने लावला होता.त्यामुळे अधिकाऱ्यांसह मंत्रालयातील प्रशासनातील व राजकीय क्षेत्रातील अनेकांचा हिरमोड झाला होता.मात्र यात विनंती बदल्यांचा "समृद्धी महामार्ग" तयार केल्यामुळे बदल्यात "दंगल" करणाऱ्यांचा पुन्हा उत्साह वाढला. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाने ठरवून दिलेली विनंती बदल्यांची तारीख आणखी वाढवून बदल्यांत नाराज झालेल्यांना पुन्हा गोंजारायला पुरेसा कालावधी मिळाला. त्यानुसार तब्बल 162 अधिकाऱ्यांचे आज शुक्रवारी बदली आदेश जाहीर करण्यात आहे. 

आदेश खालील प्रमाणे