कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने मंत्रालय दोन दिवस बंद

मंत्रालय
 28 Apr 2020  844

* 29 आणि 30 एप्रिल रोजी होणार मंत्रालयाचे निर्जंतुकीकरण 

लोकदूत वेबटीम 

मुंबई 28 एप्रिल 

             महाराष्ट्रात थैमान घातलेल्या कोरोनाने मंत्रालयातही शिरकाव केला आहे. 4 कर्मचारी कोरोना बांधित आढळल्यामुळे मंत्रालय आणि नविन प्रशासकीय इमारतीचे आता निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे मंत्रालय आणि त्यासमोरील नविन प्रशासकीय इमारत   २९ व ३० एप्रिल रोजी मंत्रालयातील कामकाज बंद राहणार आहे. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली. 

      कोरोनामुळे महामारीची परिस्थिती उदभवली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार सार्वजनिक ठिकाणी तसेच कार्यालयांच्या निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रालयात तीन ते चार कोरोना बाधित कर्मचारी आढळल्याची माहिती आहे. त्यानुसार मंत्रालय आणि नविन प्रशासकीय इमारतीतील सर्व कार्यालयांचे निर्जंतुकीकरणाचे काम २९ व ३० एप्रिल रोजी  करण्यात येणार आहे.