मंत्रालयातही कोरोनाचा संशयित रुग्ण; अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये घबराहट*

मंत्रालय
 17 Mar 2020  670


लोकदूत वेबटीम

मुंबई १६ मार्च 


मागील काही दिवसांत राज्यात कोरोनाच्या व्हायरसचे जनतेत भीतीचे वातावरण निर्माण केलेले असतानाच आज मंत्रालयातील एका कर्मचा-यामध्ये कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आल्याची बाब समोर आली आहे.  यामुळे मंत्रालयातील  सरकारी अधिकारी आणि  कर्मचाऱ्यांमध्ये मोठी एकच घरबाट निर्माण झाली आहे.
आज मंत्रालयात एका कर्मचाऱ्यांला कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आल्याने त्याला तातडीने पुढील वैद्यकीय तपासणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
कोरोनाचे लक्षणे आढळून आलेल्या या मंत्रालयातील कर्मचाऱ्याचा एक  भाऊ नुकताच  अमेरिकेतून आला असून तो कोरोना पाँझीटिव्ह आहे. आज मंत्रालयातील या कर्मचा-याला ताप व  कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आल्यामुळे मंत्रालयातील दवाखान्यात या कर्चमाऱ्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यामध्ये संशय आल्यामुळे या कर्मचाऱ्याला पुढील तपासणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. कोरोना सदृश्य लक्षणांचा संशय आल्यामुळे फक्त वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे मात्र यासाठी  मंत्रालयीन कर्मचाऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही असे येथील डॉक्टरांनी सांगितले. 
दरम्यान, आज दुपारीच मंत्रालयात बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी प्रवेश बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. त्या पार्श्वभूमीवर आज एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने येत्या काही दिवसांत मंत्रालयात अडचणीचा प्रसंग उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.