गृहमंत्र्यांकडून साठे कुटुंबियांचे सांत्वन

विदर्भ
 08 Aug 2020  284

साठे कुटुंबियांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचेकडून सांत्वन

लोकदूत वेबटीम 

   नागपूर८ ऑगस्ट 

 

कोझिकोड येथील विमान दुर्घटनेत नागपूरचे सूपुत्र वैमानिक विंग कमांडर दीपक वसंत साठे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज भरतनगर येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन साठे कुटुंबाचे  सांत्वन केले व धीर दिला. 
    वैमानिक विंग कमांडर दीपक यांचे वयोवृद्ध वडील कर्नल वसंत साठे, आई नीला साठे तसेच नातेवाईक यावेळी उपस्थित होते. 
    दुबईहून केरळमधील कोझीकोड येथील करिपूर विमानतळावर आलेले एअर इंडियाचे विमान लँडिंगवेळी धावपट्टीवरुन अचानक घसरल्यानंतर दरीत कोसळले. या अपघातात विमानाचे दोन तुकडे झाले. या अपघातात कॅप्टन दीपक साठे यांचा मृत्यू झाला. महाराष्ट्राचे सूपुत्र पायलट साठे एनडीएमध्ये कार्यरत होते. अपघात झालेले विमान त्यांनी दोन वेळा उतरवण्याचा प्रयत्न केला होता. तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी विमान उतरवले पण अपघात झाला. दीपक साठे अनुभवी पायलट होते. त्यांना एअरफोर्स ॲकेडमीचा प्रतिष्ठित ‘स्वार्ड ऑफ ऑनर’ सन्मान आणि 'राष्ट्रपती पदका'ने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुषमा, बहीण अंजली साठे-पराशर, मुलगा धनंजय, शांतनू, स्नुषा वैभवी तसेच बराच मोठा आप्त परिवार आहे.