चार ias अधिकाऱ्यांच्या बदल्या

मंत्रालय
 10 Aug 2020  1209

मिलिंद म्हैसकर वन विभागाच्या प्रधान सचिव पदी 

* चंद्रपुर कलेक्टर पदी अजय गुल्हाने 

लोकदूत वेबटीम 

मुंबई 10 ऑगस्ट 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील 4 सनदी आणि एक अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या  बदल्या केल्या आहे. यात म्हाडा चे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांची वन विभागाच्या प्रधान सचिव पदावर नियुक्ती केली आहे.तर चंद्रपुरचे जिल्ह्याधिकारी म्हणून अजय गुल्हाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

         वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आणि चंद्रपुर जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांची उचलबांगड़ी  करुण नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवले आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाचे  सचिव संजय खंदारे यांची महाजनको च्या व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती केली आहे. औरंगाबाद जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची मुख्य सचिवांचे उप सचिव म्हणून तर अतिरिक्त जिल्हाधिकारी असलेले के एच भगत यांची साई संस्थान शिर्डी येथील मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.