तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मंत्रालय
 13 Aug 2020  640

विनीता वेद सिंघल यांच्यासह तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या 

लोकदूत वेबटीम 

मुंबई 13 ऑगस्ट 

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहे. यात एक महिन्यांपूर्वी च आदिवासी विकास विभागाच्या सचिव पदी आलेल्या विनीता वेद सिंघल यांची दुसऱ्यांदा बदली केल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यांना कामगार विभागाच्या सचिव पदावर नियुक्त केले आहे. 

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहे. यात अनूपकुमार यादव यांची नियुक्ती आदिवासी विकास विभागाच्या सचिव पदावर करण्यात आली आहे.यापूर्वी ते कुटुंब कल्याण आयुक्त होते.मागील आठवड्यात त्यांची विक्रीकर विभागात बदली झाली होती.मात्र त्यात बदल करुण त्यांचे आज नव्याने आदेश जाहिर केले. तर रायगड जिल्हा परिषदेचे सीईओ पदावरून बदली झालेले दिलीप हळदे यांची व्यवस्थापकीय संचालक मार्केटिंग फेडरेशन मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली.