मुख्यमंत्र्यांसह 9नवनिर्वाचित सदस्यांचा सोमवारी शपथविधी

विधिमंडळ
 17 May 2020  754

* बिनविरोध नियुक्त 9 सदस्य घेणार सदस्यत्वाची शपथ 

* सोमवारी दुपारी मध्यवर्ती सभागृहात सदस्यत्वाची दिली जाणार शपथ 

लोकदूत वेबटीम 

मुंबई 17 मे 

विधान परिषदेवर नुकतेच बिनविरोध निवड झालेल्या 9 सदस्यांना विधान परिषद सदस्यत्वाची शपथ सोमवारी दुपारी 1 वाजता मध्यवर्ती सभागृहात देण्यात येणार आहे. विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह 9 नव्या सदस्यांना शपथ देणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे.

       विधान परिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक घोषीत केली होती.त्यानुसार उमेदवारी दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र उमेदवारी मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी 9 जागेसाठी केवळ 9 उमेदवारी अर्ज उरल्याने शिवसेनेचे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,निलत गोरे,राष्ट्रवादी कॉंग्रेस चे शशिकांत शिंदे,अमोल मिटकरी,कॉंग्रेस चे राजेश राठोड तर भाजपचे रमेश कराड,प्रविण दटके,गोपीचंद पडवळकर आणि रणजीतसिंह मोहिते पाटील हे बिनविरोध निवडून आले. त्यामुळे या नवनियुक्त 9 सदस्यांना विधान परिषद सदस्यत्वाची शपथ देण्यासाठी सोमवारी दुपारी 1 वाजता विधान भावनातील मध्यवर्ती सभागृहात शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.