विधान परिषद निवडणूक;चार उमेदवारांचे अर्ज दाखल

विधिमंडळ
 08 May 2020  624

भाजपकडून दटके,रणजीतसिंह,गोपछडे,पडवळकर यांनी केली उमेदवारी दाखल

* भाजप प्रदेशाध्यक्ष,विरोधी पक्षनेते यांच्या उपस्थितीत उमेदवारी दाखल 

लोकदूत वेबटीम 

मुंबई 8 मे 

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी जाहिर झालेल्या चारही उमेदवारांनी शुक्रवारीच आपले उमेदवारी अर्ज विधिमंडळ अधिकाऱ्यांकडे दाखल केले आहे. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,प्रविण दराडे, माजी मंत्री आशीष शेलार आणि विनोद तावडे उपस्थित होते.
विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या 9 जागेसाठी 21 मे रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे.या निवडणुकीत भाजप पक्षाने शुक्रवारी दुपारी दिल्लीतून 4 उमेदवार रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेत जेष्ठ नेत्यांना डावलत चार नव्या चेहऱ्यांना संधी देत उमेदवारी जाहिर केली. लगोलग भाजपकडून उमेदवारी जाहिर झालेले डॉ अजित गोपछडे,प्रविण दटके,रणजीतसिंह मोहिते पाटील,आणि गोपीचंद पडवळकर यांनी दुपारीच विधानमंडळ गाठून निवडणूक अधिकारी तथा विधिमंडळ सचिव भागवत यांच्याकडे उमेदवारी दाखल केली. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे अद्यापही उमेदवार जाहिर झाले नसून महाविकास आघाडी एकूण किती उमेदवार रिंगणात उतरवनार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.