सुपर मार्केट मध्येही मिळणार वाईन

मंत्रालय
 27 Jan 2022  403

सुपर स्टोअर्समध्ये मिळणार वाईन

लोकदूत वेबटीम 

मुंबई 27 जानेवारी 


यापुढे एक हजार चौ. फूटाच्या सुपर स्टोअर्समध्ये वाईन खरेदी करता येणार आहे. तसा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत गुरुवारी घेतला आहे. राज्यातील वाईनचा खप वाढावा यासाठी निर्णय घेतल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
महाराष्ट्र वाईनचे उत्पादनात अग्रेसर राज्य आहे. राज्यात २ कोटी ६० लाख लिटर्स वार्षिक उत्पादन होते. मात्र राज्यात खप केवळ ७६ लाख लिटर आहे. सुपर स्टोअर्समध्ये वाईन विक्री होऊ लागल्यास राज्यातील खप वाढणार आहे.
३० जानेवारीपर्यंत वाईनवर मुद्रांक शुल्क माफ होते. मात्र यापुढे बल्क लिटरमागे १० रुपये मुद्रांक शुल्क आकारण्यात येणार आहे. किराणा दुकानात वाईन मिळणार नाही. २ फूट अंतर जाण्यायेण्यास असेल अशा वाॅक ईन स्टोअर्समध्ये राज्यात वाईन मिळणार आहे.


या निर्णयावर भाजपने सडकून टिका केली आहे. आघाडी सरकार राज्याला मद्यराष्ट्र करत आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मात्र भाजपची सत्ता असलेल्या गोवा व हिमाचल प्रदेशात हा निर्णय पूर्वीच घेतलेला आहे, असा दावा अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक म्हणाले.