13 मंत्री कोरोना बाधित झाल्याने मंत्रिमंडळ बैठक रद्द

मंत्रालय
 04 Jan 2022  468

७० आमदार, १३ मंत्र्यांना कोरोनाची लागण
राज्य मंत्रीमंडळाची आजची बैठक झाली रद्द

लोकदूत वेबटीम 

मुंबई 5 जानेवारी 


उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळातल्या १३ मंत्र्यांना कोरोना विषाणुची बाधा झाली असून ७० आमदारांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्या, बुधवारी होणारी राज्य मंत्रीमंडळाची साप्ताहीक बैठक रद्द करण्यात आली आहे.

दर बुधवारी किंवा गुरुवारी मंत्रीमंडळाची बैठक होते. कोरोना संसर्गापासून ही बैठक मंत्र्यालयाऐवजी मलबार हील येथील सह्याद्री अतिथीगृहात होत होती. तसेच मुख्यमंत्री या बैठकीला दूरदृश्य प्रणालीव्दारे या हजेरी लावत होते. उद्या, बुधवारी बैठक आयोजित करण्याचे नियोजन होते.

मंत्रीमंडळातल्या १३ सदस्यांना कोरोनाची बांधा झाली आहे, त्यामुळे मंत्रीमंडळ बैठक रद्द करण्यात आल्याचे मंत्र्यांच्या खाजगी सचिवांना दुपारी निरोप देण्यात आले. मंत्रीमंडळ बैठकीदिवशी बहुतांश आमदार आपली कामे घेऊन मंत्र्यांना भेटण्यासाठी मंत्रालयात येत असतात. कार्यकर्त्यांची व कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी असते. ७० आमदारांना कोरोनची लागण झाल्याने चिंता व्यक्त करत मंत्रीमंडळ बैठक रद्द करण्याचा निर्णय झाला.

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकुर आणि आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांना कोरोना संसर्ग झाला आहे.

आमदार सागर मेघे, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार शेखर निकम, आमदार इंद्रनील नाईक, आमदार चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर), आमदार माधुरी मिसाळ आदी ७० आमदारांना कोरोनाची बाधा झाली आहे.
-----------------------------