एमएमआर मधील शाळा बंद

मंत्रालय
 03 Jan 2022  437

१० वी १२ वी वगळून मुंबई, ठाण्यातील शाळा बंद

-मुंबई, नवी मुंबई व ठाणे महापालिकेने घेतला निर्णय


-३१ जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय  बंद


-राज्याच्या इतर भागातील शाळा मात्र चालु राहणार

लोकदूत वेबटीम 

 मुंबई 3 वृत्तसेवा 

मुंबई महानगर क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णवाढ चिंतेचा विषय ठरु लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई , ठाणे आणि नवी मुंबई क्षेत्रातील पहिली ते नववी आणि अकरावीच्या शाळा 4 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहेत. तसा निर्णय या महापालिकांनी सोमवारी जारी केला आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता महापालिकांनी शाळांबाबत आज निर्णय घेतला आहे. ऑफलाईन शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शाळा या सुरु राहणार आहेत.  मुंबई महापालिका क्षेत्रातील 10 आणि 12 वीचे वर्ग वगळता अन्य असणाऱ्या सर्व व्यवस्थापन आणि सर्व माध्यमांच्या शाळा प्रत्यक्ष अध्ययनासाठी बंद ठेवून ऑनलाई पद्धतीने सुरू ठेवण्यात येणार आहेत.

ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूची लागण होऊ नये यासाठी मुंबई महापालिका क्षेत्रातील पहिली ते नववी आणि अकरावी यांच्या शाळा 4 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहेत. खासगी शाळाही पात्र असणाऱ्या 15 ते 18 या वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करून घेण्यासाठी त्यांना शाळेत बोलवता येईल असेही मुंबई महापालिकेने आपल्या पत्रकात म्हटले आहे.
---------------------
कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान १४ मार्च २०२० पासून राज्यातील शाळा बंद करण्यात आल्या होत्या. ४ आॅक्टोबर २०२१ पासुन टप्प्याटप्प्याने १ ते आठवीचे वर्ग सुरु करण्यात आले होते. आता परत ३१ जानेवारी २०२२ पर्यंत शाळा बंद करण्यात आल्या आहेत.  
-------------------