शासकीय रुग्णालयाचे फायर ऑडिट साठी 217 कोटी रुपये देणार

मंत्रालय
 08 Nov 2021  441

रुग्णालयांचे फायर आँडीटला  २१७ कोटी देणार

राजेश टोपे यांची माहिती

लोकदूत वेबटीम

 मुंबई 8 नोव्हेंबर

अहमदनगरमध्ये रुग्णालयाला लागलेल्या आगीनंतर राज्यातील रुग्णालयांचे फायर सेफ्टी आँडीट करण्यासाठी तातडीने २१७ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक जिल्ह्यात फायर सेफ्टी आँफीसर नियुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

राज्यात रुग्णालयांना वारंवार लागणा-या आगींची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. नगरमधील रुग्णालयात शाँर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सकृतदर्शनी दिसून येत असल्याच आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले. प्रत्येक जिल्ह्यातील अग्निसुरक्षा अधिकारी जिल्हा, तालुका व ग्रामीण पातळीवरील रुग्णालयांमधील अग्निसुरक्षा यंत्रणांचा आढावा घेतील. प्रत्येक तालुक्यात फायर सेफ्टी अधिकारी नियुक्त केला जाईल असेही राजेश टोपे म्हणाले.

आगीच्या या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात फायर सेफ्टी अधिकारी हे पद निर्माण केले जाईल. हा अधिकारी अग्नि सुरक्षा प्रतिबंधक उपाययोजनांवर लक्ष ठेवण्याचे काम करील.

नगरमधील आगीच्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेली समितीला आठ दिवसात अहवाल सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

चौकट...

रुग्णालयांच्या आयसीयू विभागात कोणत्या प्रकारच्या वीजेच्या वायर  व वीजेची उपकरणे कोणत्या दर्जाची असावीत याचा विचार करण्याची गरज आहे.

राजेश टोपे, सार्वजनिक आरोग्य मंत्री

......................