महानगरपालिका आणि नगरपालिकेत बहूसदस्यीय प्रभाग पद्धती

मंत्रालय
 22 Sep 2021  497


* मनपात 3, नगरपालिका आणि नगरपरिषदेत २ सदस्यीय पदधत

लोकदूत वेबटीम 
मुंबई २२ सप्टेंबर 

महानगरपालिकांसाठी महाविकास आघाडी सरकारने अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.मुंबई महानगरपालिका वगळता इतर सर्व महानगरपालिका निवडणुकांत ३ सदस्यीय प्रभाग पदधत असणार आहे.मुंबई महानगरपालिकेत १ सदस्यीय पदधत कायम राहणार आहे.नगरपालिका आणि नगरपरिषदेत २ सदस्यीय तर नगरपंचायतीत १ सदस्यीय प्रभाग पदधत असणार आहे.राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.या निर्णयामागे कोणतेही राजकारण नसून राज्य शासनाच्या निधीचा योग्य विनियोग व्हावा तसेच जनतेसाठीची नागरी कामे योग्यरितीने करता यावी हाच या निर्णयामागचा प्रमुख उददेश आहे.यात कोणताही राजकीय अभिनिवेश नसल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.याबाबतचा अध्यादेश आता मंजुरीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे.

आगामी महानगरपालिका निवडणूका सध्याच्या प्रभाग पदधतीनुसार होणार की नव्या पदधतीने होणार याबाबत चर्चा सुरू होती.राज्यात भाजपाचे सरकार आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व मिळविण्यासाठी भाजपाने महापालिकांच्या २०१७ च्या निवडणूकांपासून महापालिकांचे चार प्रभाग केले.परिणामी बहुतांश महापालिका भाजपाच्या ताब्यात आल्या.बहुसदस्यीय प्रभाग भाजपाला फायदेशीर ठरत असल्याने त्यात बदल करण्यात यावे असेच मत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे होते.महाविकास आघाडीतील तीन पक्षांचे याबाबत एकमत होत नसल्याने हा निर्णय लांबणीवर पडला होता.तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या या विषयावर बैठकाही झाल्या होत्या.मात्र अंतिम निर्णय होत नव्हता.मात्र निवडणुकांसाठी चार-साडेचार महिन्यांचाच अवधी शिल्लक राहिल्याने यावर लवकर निर्णय घेणे अपेक्षित होते.त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

राजकीय फायदा नजरेसमोर ठेवून निर्णय नाही-एकनाथ शिंदे
निवडणुकांमध्ये भाजपाला नुकसान व्हावे व तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारला फायदा व्हावा याद़ष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र हे आरोप खोडून काढले आहेत.या निर्णयामागे कोणताही राजकीय फायदा घेण्याचा उददेश नसल्याचे सांगताना एकनाथ शिंदे म्हणाले,यापुर्वी चार सदस्यांचा प्रभाग होता.हा मोठा प्रभाग होतो.कामांच्या द़ष्टीने सोयीचे व्हावे तसेच नागरी कामे वेगाने व्हावीत यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे.लोकांची कामे योगय पदधतीने झाली पाहिजेत तसेच राज्य शासनाच्या निधीचे योग्य पदधतीने वितरण व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.

दरम्यान,मुंबई,पुणे,पिंपरी-चिंचवड,ठाणे,उल्हासनगर,भिवंडी-निजामपूर,पनवेल,मीरा-भाईंदर,सोलापूर,नाशिक,मालेगाव,परभणी,नांदेड-वाघाळा,लातूर,अमरावती,अकोला,नागपूर आणि चंद्रपूर या महापालिकांच्या निवडणूका येत्या काळात होउ घातल्या आहेत.