पालघर प्रकरण भोवले:पोलीस अधिक्षकांची उचलबांगड़ी

मंत्रालय
 23 May 2020  922

पालघर हत्या प्रकरण पोलीस  अधिक्षकांची उचलबांगड़ी 

* दत्तात्रेय शिंदे पालघरचे नवे पोलिस अधीक्षक 

लोकदूत वेबटीम 
मुंबई 23 मे 

पालघर येथे साधूंच्या हत्येप्रकरणी हलगर्जी पणाचा ठपका ठेवत सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या तत्कालीन पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांची उचलबांगड़ी केली आहे.तर  पालघरच्या पोलीस अधीक्षक पदी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी येथे कार्यकारी संचालक पदावर प्रतिनियुक्तीवर असलेले दत्तात्रय शिंदे यांची नियुक्ती राज्य सरकारने केली आहे. गौरव सिंग यांना अद्याप कुठलीही नियुक्ती दिली गेली नसून याबाबत  गृह विभागाने याबाबत आदेश निर्गमित केले आहे.
पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस स्टेशन हद्दीत 16 एप्रिल 2020 रोजी मध्यरात्री शंभर जणांच्या समूहाने काही गैरसमजुतीतून हल्ला केला होता. यात लगतच्या सीमेजवळ असलेल्या दादरा नगरहवेली येथे जाणाऱ्या दोन साधून झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला होता. राज्यात एकीकडे कोरोचे संकट रोखण्यात पोलीस यंत्रणा आणि राज्य सरकार मग्न असताना, दुसरीकडे काळीमा फासणारा घृणास्पद असा प्रकार पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला होता. यासंदर्भातील समाज माध्यमांवर प्रसारित झालेल्या चित्रफितीत, सदर घटना ठिकाणी पोलिसांच्या देखत सदर प्रकार झाल्याचे पाहायला मिळाले. या प्रकरणाचे महाराष्ट्रासह दिल्लीतही पडसाद उमटले होते. तर राज्यात काहीवेळ राजकीय वातावरणही तापले होते. सदर घटने चे गांभीर्य पाहून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले होते. यादरम्यान पाच प्रमुख हल्लेखोर आणि 100 अन्य जणांना पकडून गुन्हे अन्वेषण विभागाकडून कसून चौकशी केली जात होती. दरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर तत्कालीन पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. तर या कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन ही केले होते. या संबंधी अधिक चौकशी सुरू असून शनिवारी गौरव सिंग यांची बदली करत,ऊर्जा विभागात प्रतिनियुक्तीवर ती असलेले दत्तात्रय शिंदे यांची पालघर पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती आदेश गृह विभागाने निर्गमितकेले आहे.