कोरोना विरोधी लढा सुरु असतांनाही मनपा आयुक्तांच्या बदल्या

मंत्रालय
 20 May 2020  1369

* कोरोना विषानु  नियंत्रणासाठी उपाययोजना आणि निकड असे गोंडस कारण देत बदली आदेश निर्गमित 

लोकदूत वेबटीम 

मुंबई 20मे 

   राज्यात शहरी भागात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. त्यासाठी सम्बंधित मनपा आणि नगरपरिषद यंत्रणा उपाययोजना करण्यात मग्न असतांना राज्याच्या नगरविकास विभागाने मंगळवारी रात्री उशिरा  मुख्याधिकारी गट अ संवर्गातील तीन मनपा आयुक्त आणि तीन अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्या केल्या आहे. सम्बंधित शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल्या जाणाऱ्या उपाययोजना सुरु असतांनाच नगरविकास मंत्रालयाने कोरोना विषाणु नियंत्रनासाठी गाम्भीर्य पाहता त्याची निकड लक्षात घेवून उपाययोजना करण्याचे गोंडस कारण देत बदली आदेश निर्गमित केल्याने आश्चर्य होत आहे.

       राज्यात सर्वाधिक कोरोनाचा प्रादुर्भाव हा मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रात अधिक वाढत आहे. यासाठी या भागातील मनपा आपल्या परिणे आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत आहे. मात्र काही दिवसांपूर्वी अंबरनाथ आणि कुळगाव बदलापुर नगर परिषदसह 12 नगरपालिका आणि मनपा अधिकाऱ्यांचे  बदली आदेश निर्गमित केले होते. यात कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यात मग्न असलेल्या अंबरनाथ आणि बदलापुर नप मुख्याधिकाऱ्यांचा अतिरिक्त आयुक्तांचा समावेश होता. तर मंगळवारी रात्री काढलेल्या बदली आदेशात नगरविकास विभागाने पनवेल,उल्हासनगर,परभणी मनपा आयुक्त तर ठाणे मनपा येथील दोन तर एक वसई विरार मनपा  अतिरिक्त मनपा आयुक्तांचा समावेश आहे. 

      मुळात राज्यातील शहरी भागात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे. यात मुंबई महानगर विकास प्रधिकरणातील मनपा आणि नप क्षेत्रात अधिक प्रादुर्भाव असल्याने समबन्धित यंत्रणा गुंतलेल्या असत्यांना त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रशासकीय प्रमुख असलेल्या आयुक्तांच्या व मुख्याधिकाऱ्यांच्या कोरोना विषाणु नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यासाठीचे कारण देत तड़काफडकी बदली आदेश निर्गमित केले जात  आहे. यामुळे समबन्धित नप आणि मनपा यंत्रणा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गुंतलेली असतांना बदली आदेश काढून नेमक नगरविकास विभागाला काय साध्य करायचे आहे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

    त्या त्या क्षेत्रात गेल्या तीन महिन्यांपासून कोरोना विषाणुला नियंत्रणात आणण्याचे रात्रंदिवस अतोनात काम करत असतांना नगरविकास विभाग त्यांच्या बदल्या करुण कोणत्या नव्याने उपाययोजना करणार ?  हे मात्र अद्यापही अस्पष्ट आहे. बदली झालेले मनपा आयुक्त हे आपल्या मनपा क्षेत्रात योग्य कामगिरी करत नव्हते का ? शहरात कोरोना वाढू न देण्यात यशस्वी ठरलेले आयुक्त अथवा मुख्याधिकारी हे आपल्या अत्यावश्यक सेवेत आपल्या कार्यक्षेत्रबाहेर जाणाऱ्या कर्मचाऱ्यामुळे शहरात कोरोना वाढला. त्याला योग्य पद्धतीने आणि तातडीने उपयोजना करत असतांना त्यांच्या बदल्या करण्याचे काय कारण ? यावर मात्र नगरविकास विभागाने ठोस कारण न देता केवळ कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी निकड आणि उपययोजनेचे झालर लावून  काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहे. यामागे नेमका नगरविकास विभागाचा हेतु स्पष्ट होत नसून, त्यामुळे नव्याने बदलून आलेले अधिकारी त्या त्या शहरात कोरोनाला नियंत्रित आणण्यासाठी कोणती जादूची कांडी फिरावणार आहे हे पाहणे महत्वाच ठरणार आहे.

बदली झालेले अधिकारी पुढील प्रमाणे 

गणेश देशमुख,पनवेल मनपा आयुक्त - ठाणे मनपा अतिरिक्त आयुक्त,

सुधाकर देशमुख उल्हासनगर मनपा आयुक्त - पनवेल मनपा आयुक्त 

रमेश पवार,परभणी मनपा आयुक्त - उपसंचालक नगरप्रशासन संचालनालय 

देवीदास पवार, उपसंचालक न प संचालनालय-आयुक्त परभणी मनपा 

संजय हेरवाडे,अतिरिक्त आयुक्त वसई विरार मनपा - अतिरिक्त आयुक्त ठाणे मनपा 

समीर उन्हाळे,अतिरिक्त मनपा आयुक्त ठाणे मनपा- उल्हासनगर मनपा आयुक्त 

राजेंद्र अहिवार अतिरिक्त मनपा आयुक्त ठाणे- त्यांची प्रतिनियुक्ती संपुष्टात आणून महसूल या मूळ विभागात त्यांची सेवा प्रत्यापित केली आहे.