प्रविण परदेसी यांनी दिला रजेचा अर्ज

मंत्रालय
 09 May 2020  1097

मुख्यसचिवांवर नाराज प्रविण परदेसी 

* नगरविकास विभागाची सूत्र स्वीकारताच दिला रजेचा अर्ज

लोकदूत वेबटीम 
मुंबई 9 मे 

मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवत बृहन्मुम्बई मनपा आयुक्त पदावरुन उचलबांगड़ी केलेले प्रविण परदेसी यांनी नव्या पदाची सूत्र  घेताच आपल्या रजेचा अर्ज सरकारकडे दाखल केला आहे. 
       राज्यात सर्वाधिक फटका कोरोनाचा मुंबईत बसला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या पथकाने मुंबईत पाहणी करुण काही सूचना केल्या होत्या. परन्तु त्यावर अमल न झाल्याने मुंबईत कोरोनाचा उद्रेक होत असल्याची नाराजी केंद्रीय पथकाने राज्य सरकारकडे व्यक्त केली. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बृहन्मुम्बई मनपा मध्ये फेरबदल करीत आयुक्त प्रविण परदेसी यांची बदली केली. शिवाय अन्य दोन अतिरिक्त आयुक्तांचीही बदली करुण अश्विनी भिड़े आणि संजीव जैस्वाल यांची नियुक्ती केली.यामुळे प्रविण परदेसी चांगलेच नाराज झाले असून या माध्यमातून मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आपले मनसूबे साध्य केल्याची चर्चा प्रशासनत रंगली  आहे. शिवाय याला अजोय मेहता बृहन्मुम्बई मनपा आयुक्त असतांना मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून प्रविण परदेसी कार्यरत असतांना विविध विषयावरून रंगलेल्या वादाची किनार असल्याचीही जोरदार चर्चा रंगली आहे. केंद्रीय पथकाने व्यक्त केलेली नाराजीचा फायदा घेत आपल्या गटातील तीन अधिकाऱ्यांना बृहन्मुम्बई मनपात पाठवले असल्याची चर्चा मंत्रालयीन स्तरावरील प्रशासनत सुरु आहे.
     त्यामुळेच प्रविण परदेसी यांनी नगरविकास विभागाची सूत्र हाती घेत लगेचच आपल्या सुट्टीचा अर्ज दाखल केला आहे. मात्र शनिवार रविवार सुट्टी असल्याने सोमवारी त्यांच्या अर्जावर निर्णय घेवून अन्य अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त सूत्र सोपवनार असल्याचे समजते. त्याच बरोबर सार्वजनिक विभागाच्या सचिव पदावर नियुक्ती झालेल्या किशोरराजे निंबाळकर यांनाही हजर होण्यापासून रोखण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.