शैक्षणिक शुल्क वाढ करू नका;शिक्षण मंत्र्यांचे आदेश

मंत्रालय
 09 May 2020  811

राज्यात शैक्षणिक शुल्क वाढ करू नका
* शिक्षण विभागाचे शैक्षणिक संस्थांना आदेश

लोकदूत वेबटीम 
मुंबई 9 मे 

राज्यात कोविड 19 या आजाराचा प्रादुर्भाव आणि त्याला प्रतिबंध करण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेऊन लॉकडाउन सुरू आहे. त्यामुळे सन 2020-2021या चालू शैक्षणिक वर्षात कुठल्याही पद्धतीची फी वाढ करू नका असे आदेश राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना राज्य सरकारने दिले आहे. यामुळे राज्यातील पालकांना मोठा दिलासा मिळालेला आहे.
राज्यात लॉकडाउन मुळे खाजगी शैक्षणिक संस्थेत मोठ्या प्रमाणात शैक्षणिक शुल्कात वाढ करून विद्यार्थ्यांच्या पालकांकडून शैक्षणिक शुल्क आकारण्याचा तगादा लावला होता. या बाबत अनेक तक्रारी राज्य सरकार कडे प्राप्त झाल्या होत्या. शिवाय राज्याचे माझी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनीही याबाबत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र लिहिले होते. त्यानंतर राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने यावर चर्चा करून 8 मे रोजी निर्णय घेतला आहे. यात नव्याने चालू शैक्षणिक वर्षासाठी कोणतीही शुल्क वाढ करू नये, पालकांच्या सोयीसाठी शैक्षणिक शुल्क वार्षिक एकदाच न घेता टप्प्या टप्प्याने भरण्याची मुभा द्यावी, चालू शैक्षणिक वर्षात काही सुविधा कराव्या लागत नाही तर त्यामुळे खर्चही कमी येणार असल्याने पालकांच्या कार्यकारी समितीत ठराव करून शुल्क कमी करण्याबाबत निर्णय घ्यावा,शिवाय लॉकडाउन च्या परिस्थितीत पालकांना शुल्क आकारणीसाठी ऑनलाईन चा पर्याय द्यावा असे आदेश शिक्षण विभागाने काढलेल्या आदेशात दिले आहे. लॉकडाउन मुळे अनेक आर्थिक संकट उभे राहिले असून भविष्यात याला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे पालकांपुढे मोठा पेच उभा राहिला असल्याने यात शिक्षण विभागाने मोठा दिलासा दिला आहे.