बीएमसी आयुक्त परदेसीसह अन्य आएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मंत्रालय
 08 May 2020  1189

* कोरोनामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले bmc मोठे फेरबदल 

लोकदूत वेबटीम 

मुंबई 8 मे 

 

बृहन्मुम्बई  मनपा क्षेत्रातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि बृहन्मुम्बई येथील रुग्णालयातील गोंधळ पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कठोर निर्णय घेतला आहे. बृहन्मुम्बई मनपा आयुक्त प्रविण परदेसी यांची तडकाफडकी बदली केली असून त्यांना नगर विकास विभागाच्या अप्पर मुख्य सचिव पदावर नियुक्ती दिली आहे. तर या ठिकाणी प्रधान सचिव म्हणून असलेले. इकबाल चहल यांची बृहन्मुम्बई मनपा आयुक्त म्हणून पाठविण्यात आले आहे.

     बृहन्मुम्बई मनपा चे अतिरिक्त आयुक्त असलेल्या जयश्री भोज यांची उचलबांगड़ी करुण त्यांना व्यवस्थापकीय संचालक म्हणून लघु उद्योग महामंडळात पाठविले असून त्यांच्या ठिकाणी अश्विनी भिडे यांना नियुक्ती देण्यात आली आहे. तर दूसरे अतितिक्त आयुक्त अप्पासाहेब जराड यांची बदली करुण त्यांना सचिव म्हणून मदत व पुनर्वसन विभाग मंत्रालय येथे पाठविण्यात आले असून त्यांच्या ठिकाणी प्रतीक्षा यादित असलेले ठाणे मनपा चे माजी आयुक्त संजीव जैस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांची वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदावर नियुक्ती केली आहे. तर मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिव पदावर असलेले किशोरराजे निंबाळकर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिव पदावर पाठविण्यात आले आहे.