राज्यात अडकलेल्या,कामगार,पर्यटक,विद्यार्थ्यांना आपल्या घरी जाण्याचा मार्ग मोकळा

मंत्रालय
 30 Apr 2020  1307

* त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती 

* राज्य सरकारच्या मुख्य सचिवांचे निर्देश 

लोकदूत वेबटीम 

मुंबई 30 एप्रिल 

   जागत थैमान घातलेय कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन घोषित करण्यात आला. मात्र यामुळे राज्यात विविध ठिकाणी इतर राज्यातील आणि महाराष्ट्रातील जिल्ह्यात इतर जिल्ह्यातील  विविध कामगार,पर्यटक,विद्यार्थी अडकले असल्याने विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मात्र आता या लोकांना आपल्या गावी जाण्याचा मार्ग मोकळा झाला असून राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना नोडल अधिकारी म्हणून घोषित केले आहे. यामुळे ज्या ठिकाणी कामगार,पर्यटक आणि विद्यार्थी अडकलेले आहे. त्यानी त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात संपर्क साधून परवानगी साठी अर्ज दाखल करायचा आहे.

   काय आहे मार्गदर्शक सूचना वाचा,