मुख्यमंत्र्यांनी केल्या आठ सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

मंत्रालय
 11 Mar 2020  1064
मुख्यमंत्र्यांनी केल्या आठ सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या 

# अश्विन मुद्गल सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालकपदी 

लोकदूत वेबटीम 

मुंबई ११ मार्च 

        मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांनी राज्यातील आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्या केल्या आहे. यात नागपूर अतिरिक्त विभागीय आयुक्त पदावर असलेले अश्विन मुद्गल यांची नवी मुंबई येथील सिडकोच्या सह व्यस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती केली आहे. मंत्रालयात ग्रामविकास विभागात उपसचिव असलेले अरीबम शर्मा यांची हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती केली असून परभणी जिल्हाधिकारी पदावरून बदली झालेले पी शिवा शंकर यांची नियुक्ती वखार महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर केली आहे. 

             रत्नागिरी जिल्हाधिकारी म्हणून काम केले सुनील चव्हाण यांची महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी औरंगाबाद येथे सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. श्वेता सिंघल यांची महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीच्या प्रकल्प संचालक पदावर नियुक्ती केली असून पुणे महानगर परिवहन मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांना यशदा येथे उप महासंचालक म्हणून नियुक्ती केली आहे. आर एस जगताप यांना औरंगाबाद येथे सह आयुक्त विक्रीकर विभाग तर अजय गुल्हाने यांना प्रकल्प व्यवस्थापक म्हणून जलसुराज्य २ नवी मुंबई येथे नियुक्ती केली आहे.