सामाजिक न्याय विभागातही आता मध्यवर्ती भोजन सुरु करणार

मंत्रालय
 03 Feb 2020  713

*आदिवासी विभागाच्या धर्तीवर सामाजिक न्याय विभागात

मध्यवर्ती भोजनगृह सुरु करणार*

-# ना.धनंजय मुंडे यांची माहिती 

 लोकदूत वेबन्यूज

मुंबई 3 फेब्रुवारी 

 

आदिवासी विभागातील शासकीय वसतीगृहांसाठी ज्याप्रमाणे मध्यवर्ती भोजनगृह सुरु आहे त्याच धर्तीवर सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतीगृहांसाठी प्रत्येक जिल्ह्यात मध्यवर्ती भोजनगृह योजना सुरु करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी आज येथे दिली.

            सामाजिक न्याय विभागात शासकीय वसतीगृहांसाठी मध्यवर्ती भोजनगृह सुरु करण्याबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत मुंडे बोलत होते.

           ना. मुंडे म्हणाले, सामाजिक न्याय विभागांतर्गत अनुसूचित जातीच्या विद्यार्थी व विद्यार्थींनीसाठी शासकीय वसतीगृहात प्रवेश दिला जातो. त्यांना निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य व इतर आवश्यक साहित्य मोफत पुरविण्यात येतात. शैक्षणिक साहित्य व इतर साहित्य हे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना सारख्या प्रमाणात दिले जाते परंतु भोजन हे वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या वसतीगृहात विविध प्रकारचे असू शकते. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना सारखेच व उत्तम जेवण देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आदिवासी विभागाच्या धर्तीवर मध्यवर्ती भोजनगृह सुरु करण्यात येणार आहे.

            यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव पराग जैन, समाज कल्याण आयुक्त प्रविण दराडे व सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.