मुख्यमंत्री ठाकरे यांचा फडणवीसांना धक्का

मंत्रालय
 21 Jan 2020  1175

अश्विनी भिडे यांची उचलबांगडी तर तुकाराम मुंडे नागपूर मनपा आयुक्त पदी

* मुकख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

लोकदूत वेबन्यूज

मुंबई 21 जानेवारी


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील 20 सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहे.आरे कारशेड वृृक्षतोड वरून वादग्रस्त ठरलेल्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांची उचलबांगडी केली असून त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रंजितसिंग देओलयांची नियुक्ती केली आहे. तर धडक कारवाई साठी प्रसिद्ध असलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांना नागपूर मनपा आयुक्त पदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री ठाकरे यांनी धक्का दिला असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली असून नागपूर मनपा विरुद्ध मुंबई मनपा असा सामना भविष्यात पहावयास मिळणार आहे.
एमपीसीएल चे व्यवस्थापकीय संचालक अरविंद कुमार यांची अतिरिक्त मुख्य सचिव जलसंधारण विभाग, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांची महाराष्ट्र राज्य वीज पारेषण विभागाच्या व्यवस्थापकीय संचालक, तर याठिकाणी असलेले पराग जैन नानोटिया यांची सामाजिक न्याय विभागाच्या सचिव पदी, मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त राजीव जाधव यांना उपमुख्यमंत्री अजित पावर यांच्या कार्यालय सचिव, उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता वर्मा लावंगारे यांची मराठी भाषा विभागाच्या सचिव तर साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची पुणे मनपा आयुक्त पदी नियुक्ती केली आहे.
मुद्रांक शुल्क नोंदणी नियंत्रक व महानिरीक्षक अनिल कवडे यांची सहकार आयुक्त, पुणे मनपा आयुक्त सौरभ राव यांना साखर आयुक्त, पुणे विभागीय अतिरिक्त आयुक्त एस एस डुंबरे यांची महासंचालक मेढा,अतिरिक्त जमाबंदी आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांची महानिरीक्षक व नियंत्रक मुद्रांक शुल्क विभाग, मुंबई शहर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांची सामान्य प्रशासन विभाग सचिव, मेढा महासंचालक कांतीलाल उमप यांची उत्पादन शुल्क आयुक्त, आयुक्त सीईटी आनंद रायते यांची जमाबंदी आयुक्त व अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख या ठिकाणी नियुक्ती केली आहे. संपदा मेहता यांयांना सह आयुक्त विक्रीकर विभाग मुंबई, मुख्य सचिव यांचे सचिव राजीव निवतकर यांना मुंबई शहर जिल्हाधिकारी,मुख्य सचिव यांचे सचिव म्हणून नव्याने सनदी अधिकारी झालेले मंत्रालयातील उप सचिव किरण पाटील यांची,अकोला जिल्हा परिषद सीईओ आयुष्य प्रसाद यांची पुणे जिल्हा परिषद सीईओ, तर या ठिकाणी असलेले सीईओ यु. ए. जाधव यांची अकोला जिल्हा परिषद सीईओ पदी नियुक्ती केली आहे.