त्या आयएएस अधिकाऱ्यांची बदली....आणि मुख्यमंत्र्यांच्या विभागाचा गोंधळ

मुंबई
 22 Aug 2019  976

त्या आयएएस अधिकाऱ्याची बदली अन मुख्यमंत्र्यांच्या  विभागाचा गोंधळ 

* एकाच अधिकाऱ्याचे दोन वेगवेगळे बदली आदेश 

लोकदूत वेबन्यूज टीम 

मुंबई 22 ऑगस्ट 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सूत्र असलेल्या सामान्य प्रशासन विभाग सध्या गोंधळलेल्या परिस्थितीत असल्याचे उघड झाले आहे. एका सनदी अधिकाऱ्यांची दोन आठवड्यात 3 वेळा बदली आदेश निघाले असून सामान्य प्रशासन विभागाने मात्र बुधवारी काढलेल्या दोन वेगवेगळ्या नियुक्ती आदेशात त्या सनदी अधिकाऱ्यांची दोन ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे नेमक  सामान्य प्रशासन विभागात काय चालले? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

     अहमदनगर जिल्हा परिषद सीईओ असलेले विश्वजीत माने यांच्यावर अविश्वास ठराव  पारित केल्याने त्यांची मुख्यमंत्र्यांनी उचलबांगडी करुण  7ऑगस्ट 2019 रोजी म्हाडा मुंबई येथे सीओ पदावर नियुक्ती केली.  परंतु या आदेशात बदल करुण 9 ऑगस्ट 2019 रोजी माने यांची सेल्स टॅक्स विभागाच्या औरंगाबाद येथे सहआयुक्त पदी नियुक्ती केली. मात्र आदेशावरही अमल न करता पुन्हा 19ऑगस्ट 2019 रोजी पुणे येथे आदिवासी विकास संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त पदावर नियुक्ती केली. या आदेशात 48 तासाच्या आत अंशतः बदल करुण सनदी अधिकारी विश्वजीत माने यांना महाराष्ट्र कृषि शिक्षण व् संशोधन परिषदेच्या सदस्य सचिव पदावर 21ऑगस्ट 2019 रोजी जाहिर केलेल्या आदेशात नियुक्ती दर्शवली. या अधिकाऱ्यांच्या नियुक्ती आदेशात  वारंवार होणारा बदल पाहता या अधिकाऱ्यांच्या मागे असलेला  गॉडफादर कोण ?  याचीच अधिक चर्चा आयएएस अधिकारी वर्गात रंगली.

   मात्र यावर अधिक भर तेव्हा पडली जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या सामान्य प्रशासन विभागाने 21ऑगस्ट रोजी जाहिर केलेल्या नियुक्ती आदेशात विश्वजीत माने यांची पुन्हा म्हाडा च्या मुंबई बांधकाम व पुनर्रचना मंडळाच्या सीओ पदी आणि दुसऱ्या आदेशात  पुणे येथे आदिवासी विकास संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त पदी नियुक्ती झाल्याचे  नमूद करण्यात आले. वारंवार होणाऱ्या बदलीने  मुख्यमंत्र्यांच्या सामान्य प्रशासन विभागातही  पुरता गोंधळ उडाला असल्याची चर्चा निर्माण झाली आहे.