मंत्रालयात आत्महत्यांचा प्रयत्न

मुंबई
 01 Mar 2022  234
फसवणूक झालेल्या रूपा मोरे यांचा मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न

* कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळीच पकडले

लोकदूत वेबटीम 

मुंबई 28 फेब्रुवारी 

मुंबई येथील सायन परिसरात राहणाऱ्या रूपा मोरे यांनी सोमवारी चार वाजेच्या सुमारास आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखत कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टाळला.

      मुंबई येथील सायन परिसरात उभारलेल्या एसआरए योजनेत रूपा मोरे यांना एक गाळा मिळणार होता. मात्र विकासकाने सदर महिलेची फसवणूक केल्यामुळे सदर महिला हतबल झाली होती. सध्या टीटवाळा येथे वास्तव्यास असलेल्या रूपा मोरे यांनी सोमवारी दोन मुलांसाह मंत्रालय गाठले. गृहनिर्माण विभागात निवेदन देऊनही कहाय मदत मिळत नसल्याने हताश होऊन रूपा मोरे यांनी तिसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला.  मात्र सदर मजल्यावर कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास येताच,प्रसंगावधान राखत सदर महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.त्या नंतर पोलिसांनी चौकशी केली असता सदर महिलेची विकासकाने फसवणूक केली असल्याचे उघडकीस आले.