शिवसेना नेते संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल

मुंबई
 15 Feb 2022  215

माहिती तंत्रज्ञान खात्यात २५ हजार कोटीचा घोटाळा


शिवसेना खासदार संजय राऊत यांचा फडणवीस यांच्यावर निशाणा


पीएमसी बँक घोटाळ्याचा पैसा भाजप नेत्यांकडे


भाजप नेत्यांच्या घोटाळ्याची ईडीकडे करणार  


संजय राऊत यांचा भाजपा नेत्यांवर बॉम्बगोळा

लोकदूत वेबटीम 
मुंबई 15 फेब्रुवारी 


भाजपचे नेते आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात माहिती आणि तंत्रज्ञान खात्यात २५ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी ऐतिहासिक ठरलेल्या पत्रकार परिषदेत केला.  मोहित कंबोज हा फडणवीस यांचा फ्रंटमन आहे. तो फडणवीस यांचा  "ब्ल्यू आईड बॉय" असून त्याची  पीएमसी घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवानसोबत  भागिदारी असून त्याने १२ हजार कोटींची जागा अवघ्या १०० कोटीत खरेदी केल्याचा दावाही त्यांनी केला.  मुख्यमंत्रिपदी असताना माहिती तंत्रज्ञान खाते स्वतःकडे ठेवणारे महाराष्ट्र भाजपचे सर्वेसर्वा  फडणवीस यांच्यावर निशाणा साधत  संजय राऊत यांनी आज भाजपच्या गोटात खळबळ उडवून दिली.
भाजपचे माजी खासदार आणि शिवसेना नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे किरीट सोमय्या यांचा उल्लेख दलाल, भडवा अशा शेलक्या शब्दात करत त्यांच्यावर खंडणीखोरीचा आरोप केला, पीएमसी बँक घोटाळाप्रकरणातील आरोपी राकेश वाधवान यांच्या एचडीआयएल कंपनीसोबत सोमय्या यांची आर्थिक संबंध  आहेत. सोमय्या यांचे चिरंजीव नील यांच्याशी संबंधित नील इन्फ्रा    कंपनीने वसईच्या गोखीवरे येथील ४०० कोटींची जमीन फक्त साडेचार कोटी रुपयाना विंकत घेतली. नील सोमय्या संचालक असलेल्या कंपनीने पीएमसी बँक घोटाळ्याचा पैसा बांधकाम प्रकल्पात वापरला. किरीट सोमय्या यांनी पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात ८० ते १०० कोटी रुपयांची खंडणी वसूल केली आहे. सोमय्या हे महाभ्रष्टाचारी असून त्यांना आणि त्यांच्या मुलाला अटक करावी, अशी मागणीही राऊत यांनी केली.
संजय राऊत यांनी आज शिवसेना भवनात ऐतिहासिक पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सोमवारीच आपण पत्रकारपरिषद घेउन बॉम्ब फोडणार असल्याचे जाहीर केले होते.यामुळे राज्यभरात याबाबत उत्सुकता होती.राऊत यांच्यासोबत शिवसेनेचे प्रमुख नेते,आमदार,खासदार आदी सर्व उपस्थित होते.गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते सोमय्या यांनी शिवसेनेच्या नेत्यांना लक्ष्य केले आहे.राऊत यांनी आज सोमय्या  यांच्यावरच घोटाळयाचे आरोप केले.सोमैया यांचा त्यांनी भर पत्रकार परिषदेत अत्यंत शेलक्या शब्दांत उल्लेख केला. शिवाय भाजपचे नेते सुधीर मुनगटीवार,  हरियाणातील एस. नरवर, सोमय्या पिता पुत्र, मोहित कांबोज,  देवेंद्र लधानी, जितेंद्र नवलानी, राकेश वाधवान आदींची नावे घेऊन राऊत यांनी भाजप नेत्यांभोवती संशयाचे धुके अधिक गडद केले.  माझ्याशी शत्रुत्व असेल तर मला अटक करा. मात्र, महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला मी नख लावू देणार नाही. महाराष्ट्रात ठाकरे सरकार राहणारच, असे बजावताना राऊत यांनी लवकरच गदपत्रे आणि व्हिडीओ क्लिप घेऊन आणखी गौप्यस्फोट करणार असल्याचा इशारा दिला.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेत़त्वाखालील महाविकास आघाडी सरकार भाजपला पाडायचे आहे.त्याकामात मी मदत करावी अशी ऑफर मला भाजपकडून होती.मात्र मी ती ठोकरल्याने माझ्या विरोधात ईडी,सीबीआय आदी केंद्रिय तपास यंत्रणांचे शुक्लकाष्ठ लावण्यात आले.पण मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे.मी कधीच झुकणार नाही.उलट तुम्हालाच झुकवेन असा इशारा देताना राउत यांनी भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराच्या  आरोपांची राळ उडवून दिली.  हरयाणातील दूध व्यावसायिक एस.नरवर याच्या सात हजार कोटींच्या मालमत्तेत  महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचे साडेतीन हजार कोटी आहेत, असा दावा राऊत यांनी केला.
२०१४ ते २०१९ या कालावधीत माहिती तंत्रज्ञान विभागाने विना निविदा कामे दिली. ५ हजार कोटीच्या घोटाळ्याशी संबंधित अमोल काळे हा कोण आहे? असा सवाल त्यांनी केला.  हरयाणातील दुधवाला एस. नरवर हा पाच वर्षात सात हजार क्प्तीन्चा मालक कसा झाला? हा नरवर तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या घरात खुलेपणाने वावरत होता. त्याने जमा केलेल्या सात हजार कोटीपैकी साडेतीन हजार कोटी महाराष्ट्रातून गेले असून ते कुणाचे आहेत? असे सवाल करत राऊत यांनी हित काम्बोजने मुंबईतील पत्राचाळीची ४० एकर  आणि १२ हजार कोटींची जमीन अवघ्या १०० कोटी रुपयाना विअकात घेतली. पत्राचाळ पुनर्विकासात पीएमसी बँक घोटाळ्याचा पैसा असल्याचा आरोप केला. हा कांबोज एक दिवस फडणवीस यांना घेऊन बुडविणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
 किरीट सोमय्या इतरांवर पीएमसी बँक घोटाळयाचा आरोप करतात.पण त्यांचाही त्यात सहभाग आहे.राकेश वाधवानला ब्लॅकमेल करून त्यांनी त्याच्याकडून ८० ते १०० कोटींची रोख रक्कम  घेतली.निकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी राकेश वाधवान आणि किरिट सोमैया यांचा मुलगा नील सोमैया हे दोघे भागीदार आहेत.किरिट सोमैया यांनी देवेंद्र लधानी नामक व्यक्तीला पुढे करून वसईतील मौजे गोखीवरे येथील ४०० कोटींची जमिन फक्त साडेचार कोटीत विकत घेतली आहे.या माध्यमातून आता हजारो कोटींचे प्रकल्प उभारण्यात येत आहेत.हा पीएमसी बँक घोटाळयातलाच पैसा असल्याचे राऊत म्हणाले.हे सर्व कागदपत्र मी ईडीला तीन वेळा पाठविले आहेत.पण हाच सोमय्या डी कार्यालयात बसून दही खिचडी खात असतो.आता मी मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांना भेटून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणार आहे.तसेच वसईतील या प्रकल्पाला पर्यावरणाची परवानगी नाही. हरित लवाद  या प्रकरणी २०० कोटींचा दंड ठोठावू  शकतो. त्यामुळे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाची दखल घेउन कारवाई करावी, असे आवाहनही राऊत यांनी केले.

ईडीच्या नावाखाली नवलानीची मुंबईतल्या बिल्डरांकडून ३०० कोटींची वसुली
जितेंद्र नवलानी ही व्यक्ती कोण आहे? हा माझा ईडीला सवाल आहे.या व्यक्तीने मुंबईतल्या ६० बिल्डरांकडून ईडीच्या नावाखाली ३०० कोटी रूपयांची वसुली केली आहे.फरीद शमा,फिरोज शमा,रोमी या व्यक्ती कोण हे देखील ईडीने सांगावे.ईडीचे अधिकारी काय अय्य्याशी  करतात हे देखील मी देशाला दाखवणार आहे.महाराष्ट्र,बंगाल आणि झारखंड ही राज्य सरकारे पाडण्याचे भाजपचे षडयंत्र आहे.त्यासाठी ईडीला आणि इतर केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरण्यात येत आहे.पण मला गोळी घातली तरी मी झुकणार नाही, असे प्रतिआव्हान राऊत यांनी दिले.
मी त्या रात्री अमित शहांना फोन केला होता
राज्यातील सरकार पाडायला मी नकार दिल्यानंतर माझ्या निकटवर्तीयांच्या घरात ईडीच्या धाडी सुरू झाल्या.त्या रात्री मी केंद्रीय गहमंत्री अमित शहांना फोन केला.जे चाललेय ते योग्य नाही.तुमची माझ्याशी दुष्मनी असेल तर मला अटक करा.पण माझ्या निकटवर्तीयांचा छळ करू नका.इतरही काही लोकांशी मी त्यावेळी बोललो, असेही राऊत म्हणाले.

अलिबागमधील ठाकरेंचे ते १९ बंगले सोमय्यानी  दाखविले तरमी राजकारण सोडेन
अलिबागमध्ये ठाकरे कुटुंबियांचे १९ बंगले असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.माझे सोमय्यांना  आव्हान आहे की त्यांनी हे १९ बंगले दाखवावेत.ते जर त्यांनी दाखविले तर मी राजकारण सोडेन.त्यांनी नाही दाखविले तर अख्खी शिवसेना सोमय्याना जोडयाने मारेल, असा इशारा राऊत यांनी दिला.

त्या लग्नात तर साडेनऊ कोटींचे फक्त कार्पेट
माझ्या मुलीच्या लग्नात किती खर्च झाला याची माहिती काढण्यासाठी ईडीचे अधिकारी पताकावाले,फूलवाले इतकेच नाही तर मेहंदीवाल्यांच्या घरीही पोचले.माझ्या मुलुंडमधील टेलरकडूनही त्यांनी खर्चाची माहिती घेतली.पण काही वर्षांपूर्वी भाजपच्या वनमंत्रयांच्या मुलीचे लग्न मुंबईत झाले त्यावेळी तर जंगलाचा फिल यावा म्हणून एक कार्पेट टाकण्यात आले होते. त्याची  किंमत साडेनऊ कोटी रूपये होती, असा आरोप संजय राऊत यांनी केला.