नवाब मलिक राष्ट्रवादीचे मुंबई विभागीय अध्यक्ष

मुंबई
 05 Aug 2019  156राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिले नियुक्तीचे आदेश...


लोकदूत वेबन्यूज टीम

मुंबई 5ऑगस्ट 

 मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष व माजी राज्यमंत्री सचिन अहीर यांनी शिवसेनेचे धनुष्य हाती घेतल्याने रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई विभागीय अध्यक्षपदी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज नवाब मलिक यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.