राज्याला 2 लाख 71 हजार कोटींची मदत -फडणवीस

मुंबई
 26 May 2020  48


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केली आकडेवारी 

लोकदूत वेबटीम 
मुंबई 26 मे 

   केंद्र सरकार राज्य सरकारला दुय्यम वागणूक देत असून कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत राज्य सरकारला केंद्र सरकार देत नसल्याचा आरोप  राज्य सरकारकडून केला जातो. मात्र हे सर्व चुकीच असून राजकरण करण्यासाठी आणि आपले अपयश झाकण्यासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखवत असल्याचा पलटवार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली राज्य सरकारवर केला आहे. त्याच बरोबर राज्य सरकारला केन्द्रसरकारने जाहिर केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजसह अन्य स्त्रोतमार्फत तब्बल 2लाख 71500कोटी रुपयांची भरीव आर्थिक मदत केली असल्याची माहिती यावेळी दिली.
     राज्यात कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे. त्यामुळे राज्य सरकारमधील तिन्ही पक्षाचे नेते केंद्र सरकार काहीच मदत करत नसल्याचे ओरडत आहे. मात्र ही बाब साफ चुकीचे असल्याचे फडणवीस म्हणाले.
         कोरोना प्रादुर्भाव झालेल्या कालावधीत केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरिब कल्याण याजनेत अन्नधान्य देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.या तीन महिन्यांत केंद्र सरकारने अन्नधान्य महाराष्ट्राला दिले.यात 
गहू  1750 कोटी रूपये, तांदूळ : 2620 कोटी रूपये,डाळ : 100 कोटी रूपये, स्थलांतरित मजुरांसाठी 122 कोटी रूपये,असे एकूण4592 कोटी रूपये राज्याला दिले गेले आहे.प्रधानमंत्री किसान सन्मान योजना.यात 1726 कोटी रूपये, जनधन योजनेच्या माध्यमातून 1958 कोटी रूपये, विधवा/दिव्यांग/ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी 116 कोटी रूपये असे एकूण 3800 कोटी रूपये केंद्र सरकारने दिले असून उज्वला गॅस योजनेत मोफत 73 लाख 16 हजार सिलेंडरसाठी 1625 कोटी रूपये तर  600 रेल्वेगाड्यांसाठी 300 कोटी रूपये राज्याच्या वाट्याला आले असल्याची आकडेवारी यावेळी विरोधी पक्षनेत्यांनी दिली.बीओसीडब्ल्यू आणि ईपीएफओ यासाठी एकूण 1001 कोटी रूपये,
एसडीआरएफ अंतर्गत 1611 कोटी रूपये, आरोग्यासाठी 448 कोटी रूपये असे एकूण 2059 कोटी रूपये दिले असल्याचे यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. डिव्हॅल्यूलेशन ऑफ टॅक्सेस या माध्यमातून  5648 कोटी रूपये, शेतमाल खरेदीसाठी देण्यात आलेला निधी पाहता यात 
कापूस : 5647 कोटी रूपये,धान : 2311 कोटी रूपये,तूर : 593 कोटी रूपये चणा/मका : 125 कोटी रूपये देण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट केले.पिकविमा योजनेत पीकविम्यासाठी 403 कोटी रूपये असे एकूण 9079 कोटी रूपये,हा संपूर्ण खर्च पाहता केंद्र सरकारने महाराष्ट्राला या काळात 28,104 कोटी रूपये दिलेले आहेत आहे. महाराष्ट्राला आरोग्यासाठी मिळालेली मदतीत  महाराष्ट्राला हायड्रोक्सिक्लोरोक्विन: 47 लाख 20 हजार रुपये,प्रयोगशाळांना मान्यता : शासकीय 41/खाजगी 31,पीपीई किटस : 9.88 लाखरुपये, एन 95 मास्क : 15.59 लाख रुपये,आरोग्यासाठी अन्य खरेदी करण्यासाठी  मदत 468 कोटी रुपये देण्यात आल्याचे यावेळी बोलतांना विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी सांगितले. जाहिर केलेल्या केंद्र सरकारच्या पॅकेजमध्ये एमएसएमई/गृहनिर्माण/डिस्कॉम/नरेगा/आरआयडीएफ/कॅम्पा एम्पॉयमेंट/स्ट्रीट वेंडर्स/फार्मगेट इन्फ्रा, मायक्रो फूड एन्टरप्राईजेस, पशुसंवर्धन इत्यादींतून किमान 78,500 कोटी रूपये महाराष्ट्राला मिळनार आहे. या व्यतिरिक्त   जे मिळाले ते 28 हजार कोटी रूपये, केंद्राच्या निर्णयांमुळे महाराष्ट्राला कर्जाच्या माध्यमातून जो निधी उभारता येऊ शकतो, तो 1,65,000 कोटी रूपये आणि केंद्राच्या पॅकेजमधील 78 हजार कोटी रूपये असे एकूण 2,71,500 कोटी रूपयांचा लाभ महाराष्ट्र सरकार केंद्राकडून घेवू शक्त. केंद्र सरकारकडुन राज्याला येणारी रक्कम नोव्हेम्बर पर्यंतची पूर्ण चुकती करण्यात आली असून आता केंद्रसरकारकडे लॉकडाउन मुळे उत्पन्न कमी येत आहे. मात्र केंद्र सरकार नियमांच्या पलीकडे जाऊन राज्यासाठी मदत करत असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.  यामुळे आमच्याकडे पैसा नाही म्हणून कुणाला मदत करायची नाही अशी भूमिका घेण राज्य सरकारने अशी भूमिका न घेता योग्य पाऊल उचलावे असे आवाहन करुण केन्द्र सरकारने राज्य सरकारला पैसे दिले आहे. यासाठी आता गरज धाडसी निर्णयांची असून त्याबाबत राज्य सरकारने पाऊले उचलावी असे आवाहन यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.