राज्यपाल आणि संजय राऊत यांच्या भेटीने चर्चेला उधान

मुंबई
 23 May 2020  340

* राज्यपाल कोश्यारी -खा.संजय राऊत भेट

* राज्यपालांशी मधुर संबंध ठेवण्याचा महाविकास आघाडीचे प्रयत्न 

लोकदूत वेबटीम 

मुंबई 23 मे 

    शिवसेना नेते संजय राऊत यांनी शनिवारी राजभवन गाठून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीपासून सुरु झालेला वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे  बंद दाराआड दोघांमध्ये झालेली चर्चा अद्याप बाहेर आली नसली तरी राज्य सरकार आणि राजभवन यात उद्भवलेला वाद कमी करुण मधुर संबंध निर्माण करण्यासाठी खा.राऊत यांनी भेट  घेतल्याचे समझते. मात्र भेट घेतल्या नंतर खा.राऊत यांनी राज्यपाल यांची सदिच्छ भेट घेतल्याचे सांगत  मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचे पिता -पुत्रांचे नाते असल्याचे सांगितले.शिवाय राज्यपाल आमचे मार्गदर्शक असल्याचेही यावेळी सांगितले. परंतु अचानक राज्यपाल यांच्या संदर्भात  शिवसेनेने घेतलेला  यूटर्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

                मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीपासून राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात संघर्ष सुरु झाला होता. या दरम्यान  शिवसेनेकडुन राज्यपाल यांच्यावर टिकेची झोड उठवली होती. सोबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यानी कोविड संदर्भात आढावा घेण्यासाठी राजभवन येथे बैठक बोलवली होती. मात्र यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीकडे पाठ फिरवत आपले स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांना पाठविल्याने राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात अधिक वाद चिघळल्याचे चित्र पहायला मिळाले. त्याच बरोबर उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राज्यातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याबाबत यूजीसी ला पत्र लिहिले होते. राज्यात अंतिम शैक्षणिक वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 8 ते 10 लाखांच्या घरात आहे. शिवाय मुंबई पुण्या सह अन्य शहरताही कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असून अनेक वसतिगृह आणि महाविद्यालयात कोरन्टाइन सेंटर उभारले आहे. या सर्व परिस्थितीत ग्रामीण भागाचा विचार करता ऑनलइन परीक्षाही घेणे अवघड असून विद्यार्थ्यांची सुरक्षा राखने अवघड आहे. त्यामुळे  महाराष्ट्रातील एकूण कोरोनाची परिस्थिती पाहता यूजीसी च्या नॉम्स नुसार गुण देवून परीक्षा रद्द कराव्या या संदर्भात पत्र पाठविले होते.

              यावर राज्यातील विद्यापीठांचे कुलपती असलेल्या  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून परीक्षा घेण्याची सूचना केली होती.   या सर्व परिस्थितीत राज्यपाल आणि राज्य सरकार यांचातील संबंध उत्तम राखण्यासाठी खा. संजय राऊत यांना महाविकास आघाडीने दूत म्हणून पाठविले असल्याचे समझते.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्या नंतर खा. राऊत यांनी राज्यपाल आमचे मार्गदर्शक असल्याचे वक्तव्य केले. राज्यपाल हे कुलपती असून उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आपले मत व्यक्त केले आहे. त्यावर निर्णय घेतला नसल्याचा खुलासा केला. शिवाय याबाबत मंत्री आणि कुलपती एकत्र चर्चा करुण निर्णय घेतील असेही खा.राऊत म्हणाले. विरोधकांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र विरोधकांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी असे सांगत संकटाच्य वेळी असे राजकरण करणे योग्य नसल्याची टीकाही यावेळी केली.