भाजपच्या जेष्ठ नेत्यांना धक्का,4 नव्या चेहऱ्यांना उमेदवारी

मुंबई
 08 May 2020  357

* खडसे,तावड़े,मुंडे,यांना डावललेले 

* प्रविण दटके,गोपीचंद पडवळकर,अजित गोपछडे,रणजीतसिंह यांना उमेदवारी 

* प्रदेशाध्यक्षांना मतदार संघ देणाऱ्या मेधा कुलकर्णीवरही अन्याय 

लोकदूत वेबटीम 

मुंबई 8 मे 

  विधानपरिषदेच्या रिक्त असलेल्या 9 रिक्त जागांसाठी राज्यात निवडणुकीचे वातावरण तापयाला सुरुवात झाली आहे. भाजप पक्ष यात अव्वल ठरला आहे. भाजप पक्षाने दिल्लीतून 4 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून यात नागपुर मनपाचे माजी महापौर प्रविण दटके, राष्ट्रवादीतुन भाजपच्या तंबुत  दाखल झालेले रंजीतसिंह मोहिते पाटील,भाजप प्रदेश मेडिकल सेल चे प्रदेश अध्यक्ष डॉ अजित गोपछडे आणि गोपीचंद पडवळकर यांचा समावेश आहे. 

       मात्र पक्षासाठी खस्ता खाल्लेल्या आणि पक्षाच्या वाढीस अपार काम करणाऱ्या माजी मंत्री एकनाथ खडसे,पंकजा मुंडे,विनोद तावडे यांना डावलन्यात आले आहे. विशेष म्हणजे विधान सभा निवडणुकीत आपला स्वतःचा कोथरुड मतदार संघ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी देणाऱ्या तत्कालीन भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांना परिषदेवर पाठविण्याचा शब्द दिला होता. मात्र त्यांनाही या निवडणुकीत दुर्लक्ष केल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे.   

    भाजपचे जेष्ठ नेते आणि विधानसभा उमेदवारी नकारलेले एकनाथ खडसे यांनी उमेदवारी न दिल्याने पक्षावर चांगलीच तोफ दागली आहे. तर आपला पराभव आपल्याच माणसांनी केल्याचा राग मनात ठेवून सध्या  शांत असलेल्या पंकजा मुंडे याही काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.विनोद तावडे यांनाही उमेदवारी नकारल्याने विधान परिषदेची त्यांना आशा होती. मात्र त्यातही डावलल्याने भाजपच्या जेष्ठ नेत्यांत मोठा असंतोष निर्माण झाला आहे.