मुंबईत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना कल्याण डोंबिवलीत येण्यास प्रतिबंध

मुंबई
 05 May 2020  621

मुंबई काम करणाऱ्या लोकांना कल्याण डोंबिवलीत "नो एंट्री"

* केडीएमसी मनपा आयुक्तांचे आदेश 

लोकदूत वेबटीम 

मुंबई 5 मे 

    कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रातून मुंबई नौकरी अथवा अन्य कामानिमित्त लाखो लोक जाणे येणे करतात. मात्र मुंबईत सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रातून मुंबई कामासाठी जाणाऱ्या लोकांना येत्या 8 में पासून केडीएमसी क्षेत्रात येण्यास मज्जाव करण्यात येणार आहे.

       मुंबई महानगर परिसरातील मनपा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कोरोनाची संख्या वाढत आहे.त्यामुळेच संपूर्ण mmrda परिसर रेड झोन मध्ये असून कोरोनाचा  तीव्र प्रादुर्भाव झाला आहे.  मुंबई क्षेत्रात कामासाठी लगतच्या मनपा क्षेत्रातून येणाऱ्या  लोकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे mmr झोन मधील अन्य मनपा क्षेत्रात आढळलेल्या  कोरोना बाधितांमध्ये  मुंबईतील कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे.  त्यामुळे मुंबई मनपा क्षेत्रातील कोरोनाचे लोन आपल्याकडेही पसरु नये यासाठी कल्याण डोम्बिवली मनपा आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी खबरदारी घेत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कल्याण डोम्बिवली मनपा क्षेत्रात कोरोना  बधितांची संख्या अधिक पुढे येत असल्याने त्यात मुंबईतुन येणाऱ्याची संख्या लक्षणीय आहे.  मुंबईत  जाणाऱ्या येणाऱ्या मुंबई मनपा व खाजगी रुग्णालये त्यांच्या कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था त्याच ठिकाणी करणार आहे.  त्यामुळे बँक व उर्वरित खाजगी व इतर आस्थापनेत काम करणाऱ्या लोकांनी  आपली  राहण्याची व्यवस्था मुंबईतच करण्यासबंधित आदेश दिले आहे. येत्या 8 में पासून त्यांना कल्याण डोम्बिवली मनपा क्षेत्रात येण्यासाठी प्रतिबंधित करण्यात येणार असल्याचे  मनपा आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी जाहिर केलेल्या पत्रात नमूद केले आहे.