आता मुंबई 24 तास सुरु राहणार

मुंबई
 22 Jan 2020  27

27 जानेवारी पासून रात्रीचीच्या मुंबईची सुरुवात 

* हॉटेल्स, शॉपिंग शॉप, मॉल,थिअटर राहणार सुरु 

* पब आणि बार यातून वघळले 

 

लोकदूत वेबन्यूज 

मुंबई 22 जानेवारी 

अखेर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची इच्छा पूर्ण करण्यात आली आहे. राज्यात सध्या चर्चेत असलेल्या नाइट लाइफ ही योजना आता "मुंबई 24 तास" या नावाने ओळखली जाणार आहे. मुंबईतील अनिवासी असलेल्या ठराविक ठिकाणीच, खरेदी शॉप,हॉटेल्स,मॉल आणि थिअटर  सुरु ठेवण्यास परवानगी देण्यासाठी मंत्रीमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आल्याचे गृह मंत्री अनिल देशमुख आणि पर्यटन मंत्री यांनी सांगितले.

       मुंबईत नाइट लाइफ सुरु करण्याची मागणी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली होती. त्यामुळे मंत्रिमंडळात मंत्री म्हणून समावेश झाल्यानंतर ना. आदित्य ठाकरे यांनी प्राधान्याने या मागणीसाठी पाठपुरावा केला. यावर विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षातही काही प्रमाणात विरोध केला गेला. मात्र सदर विषय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेस आला असता या निर्णयाला मंजूरी देण्यात आली.त्या  नुसार मुंबईतील काही ठराविक ठिकाणी असलेल्या अनिवासी भागात खरेदी,खाद्य पदार्थ,थिएटर,मॉल आणि अन्य दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात येणार आहे. मुंबई 24 तास या नावाने ही योजना राबविली जाणार असून यातून 10लाख रोजगार निर्माण होणार आहे.शिवाय बार आणि पब यातून वघळन्यात  आले असून ठरवून दिलेल्या भागात त्या हॉटेल्स,शॉप,मॉल आणि थिअटर मालकांनी त्यांची इच्छा असल्यास सुरु करू शकतील  असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.यामुळे रात्री अपरात्री पर्यटक आणि काम करणाऱ्या जनतेला फायदा होणार असून रोजगार आणि महसूल प्राप्त होणार असल्याचे यावेळी ठाकरे म्हणाले.

          हे सरकार महाविकास आघाडीचे सरकार असून तरुणांचा रोजगार देणारे सरकार आहे.तरुणांना बेरोजगार करणार सरकार नसल्याचे सांगत अप्रत्यक्षपणे भाजप सरकारला चीमटा काढला.