कामगार आयुक्तांचा हॉटेल मालकाला दणका

मुंबई
 10 Dec 2019  815

बाल कामगार ठेवणाऱ्या हॉटेल मालकावर गुन्हा दाखल 

* बालकामगार विरोधी मोहिम सुरु 

लोकदूत वेबन्यूज

मुंबई 10 डिसेंबर 

 

राज्यात कुठल्याही व्यावसायीक  आस्थापनेवार बालकांकडून काम करुण घेवू नये. यासाठी राज्याचे कामगार आयुक्त डॉ महेंद्र कल्याणकर यांनी बालकामगार विरोधी धडक मोहिम राज्यभरात सुरु केली आहे. त्याचाच भाग म्हणून आयुक्त कामगार यांना मिळालेल्या माहिती नुसार उल्हासनगर येथे कुमार मटन हाऊस या हॉटेल वर छापा मारून 1 बालकामगार  आणि 2 किशोरवयीन कामगार आढळून आले. त्यामुळे सदर हॉटेल मालक विकी मंगतानी यांच्यावर बाल कामगार प्रतिबंध कायद्यानुसार विठ्ठलवाडी पोलीस ठाणे उल्हासनगर येथे गुन्हा दाखल केला आहे.

      मिळालेल्या माहिती नुसार कामगार आयुक्त डॉ महेंद्र कल्याणकर यांना उल्हासनगर येथील कुमार मटन हाऊस येथे बाल कामगार असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे कामगार आयुक्त यांनी या महितीच्या आधारावर मुंबई येथील अधिकारी आणि अन्य सदस्य असलेली टीम उल्हासनगर येथे पाठवली. सदर टीम मधील अधिकाऱ्यांनी कामगार आयुक्तांच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्त घेवून कुमार मटन हाऊस येथे छापे टाकले. यात 1 बाल आणि 2 किशोरवयीन कामगार आढळले असून त्यांना टुटपुंजे वेतन देवून त्यांची मानसिक आणि शारीरिक पिळवून केली जात असल्याने या हॉटेल मालकविरोधत गुन्हा दाखल केला.या धडक कारवाईमुळे शहरात सर्वत्र हॉटेल मालकांचे धाबे दणाणले असून नागरिकांकडून मात्र या मोहिमेचे कौतुक केले जात आहे.