हीच ती वेळ ...आता नाही तर कधीच नाही - संजय राऊत

मुंबई
 02 Nov 2019  342

भाजप अपयशी ठरल्यास शिवसेना सत्ता स्थापन करण्याचा दावा करेल 

* जाहिर झालेला व्यक्ती मुख्यमंत्री होतो का?

* शिवसेना नेते संजय राऊत यांचा गौप्यस्पोट 

* दहा दिवसात का सत्ता स्थापन केली नाही.

लोकदूत वेबन्यूज 

मुंबई 2 नोव्हेम्बर 

    विधान सभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस उलटले आहे. या दहा दिवसात भाजप ने सत्ता स्थापन करण्याचा दावा करायला हवा होता असे सांगत शिवसेनेच्या 63 आमदारांचे समर्थन घेण्यासाठी का आले नाही ? असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप ला केला आहे. त्याच बरोबर शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यासाठी "हीच ती वेळ..अभी नहीं तो कभी नहीं" असे वक्तव्य करुण भाजपा ला एकप्रकारे इशारा दिला आहे.

         गेल्या दहा दिवसापासून भाजप सत्ता का स्थापन करत नाही?असा सवाल उपस्थित करुण सत्तेसाठी शिवसेनेच्या 63 आमदारांची गरज असेल तर त्यांनी याव असेही संजय राऊत यांनी एका  वाहिनीशी बोलतांना सांगितले. भाजप पक्ष दिलेल्या प्रस्ताव नकारात आहे. युतीतील  राज्य नेतृत्व फेल ठरल आहे. असाही टोला लगवला. मुख्यमंत्र्यांच्या भोवती पहिल्या फळीतील अनुभवी लोक दुर्दैवाने दिसत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकाकी पडले असल्याचा टोमनाही मारला. युतीचा प्रस्ताव हा गृहमंत्री अमित शाह यांनी दिला होता. भाजप ने तो प्रस्ताव मान्य करावा. आम्ही आतापर्यंत युतीधर्म पाळत आलो आहे.भाजप ची अडचन निवडणुकीपूर्वी समझून घेतली. आता समझून घेणार नाही. आता त्यांची अड़चन त्यांच्या जवळ असेही यावेळी राऊत म्हणाले. भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील आणि सुधीर मूंगटीवार यांना काहीच अधिकार नाही.असेही संजय राऊत म्हणाले. या परिस्थितीत कुठल्याही पक्षाचा आमदार फुटणार नाही असा दावाही यावेळी केला.

      त्यांनी जाहिर केलेला व्यक्ती अद्याप मुख्यमंत्री झाला नाही. त्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री जनतेला परिचित असलेला व्यक्तिच होईल. त्याबाबत लवकरच हालचाली दिसेल असाही गौप्यस्पोट  केला.