शिक्षण मंत्री आशीष शेलार यांच्या विरोधात मनसे उमेदवार नाही ?

मुंबई
 02 Oct 2019  280

मनसे आशीष शेलार यांच्या विरोधात निवडणूक लढवणार नाही ?

* राज ठाकरे मैत्रीला जपणार ?

लोकदूत वेबन्यूज टीम 

मुंबई 2 ऑक्टोबर 

 

राज ठाकरे आणि आशीष शेलार यांची मैत्री सर्वांनाच माहिती आहे. मात्र मधल्या काळात शेलार यांनी राज यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली होती. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत संतापाचं वातावरण होतं. असं असतानाही वांद्रे पश्चिम मतदारसंघातून मनसे निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट दिसत आहे.

मनसेचे मुंबई पश्चिम उपनगर सचिव अल्ताफ खान हे गेल्या काही महिन्यांपासून वांद्रे पश्चिम विधानसभेतून निवडणूक लढवणार, असे स्पष्ट संकेत होते. त्यादृष्टीने ते कामालाही लागले होते. प्रत्यक्षात मात्र उमेदवार म्हणून त्यांचं नाव मनसेच्या दोन्ही याद्यांमध्ये अद्याप जाहीर झालेलं नाही. 

आशीष यांच्या मैत्रीसाठी राज यांनी वांद्रे पश्चिममध्ये निवडणूक न लढण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय घेतल्याची चर्चा मनसे  कार्यकर्त्यात  सुरू झाली आहे.