हे सहा आमदार भाजप मध्ये प्रवेश करणार

मुंबई
 30 Sep 2019  652

हे सहा आमदार भाजप मध्ये प्रवेश करणार 

लोकदूत वेबन्यूज टीम 

मुंबई ‌30सप्टेंबर 

पितृपक्ष संपताच राज्यातील राजकीय पक्षांचा विधानसभा निवडणुकीसाठी वेग वाढला आहे. यात आज दुपारी काँग्रेसचे विद्यमान सहा आमदार मुंबईतील गरवारे क्लबमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार   आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याने कॉंग्रेसला आणखी भगदाड  पडले आहे.

काँग्रेसचे  सहा आमदार आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज गरवारे क्लब येथे होणा-या कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.या सहा आमदारांमध्ये माजी राज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे, चिखलीमधील राहुल बोंद्रे, मालाडचे आमदार असलम शेख, शिरपूरमधील काशीराम पवार, साक्रीतील डी. एस. अहिरे, आणि पंढरपूरमधील भारत भालके यांचा समावेश असुन, हे सहाही आमदार आज अधिकृतपणे भाजप मध्ये. प्रवेश करणार आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत आज सोमवारी १२ वाजता, गरवारे क्लब,वानखडे स्टेडियम येथे होणा-या कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.