राष्ट्रवादीवर आपला जाहीरनामा थांबविण्याची नामुष्की

मुंबई
 23 Sep 2019  408

राष्ट्रवादीने स्वतंत्र जाहीरनामा थांबवाला 

आघाडीचा संयुक्त जाहीरनामा जाहिर होणार

 

* प्रफुल्ल पटेल यांनी टोचले कान 

 

लोकदूत वेबन्यूज टीम 

मुंबई 23 

 

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने स्वतंत्रपणे तयार केलेला जाहीरनामा जाहिर न करण्याचा निर्णय घेतला. एन वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रिय सरचिटणीस यांनी हस्तक्षेप केला. त्यामुळे जाहीरनामा जाहिर करायच्या तयारीने असलेय नेत्यांना यूटर्न घेत, विधानसभा निवडणुकीत आघाडी म्हणून सर्व घटक पक्ष एकत्रित लढत असल्याने आघाडीचा   संयुक्त जाहीरनामा जाहिर करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलीक यांनी सांगितले.

                विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची आघाडी झाली आहे. त्यामुळे राष्ट्रावादी कॉंग्रेस पक्षाने कुठलाही निर्णय घेतांना कॉंग्रेस पक्षाला विश्वासात घ्या अशा सूचना प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाध्यक्ष जयंत पाटिल यांना केल्या. परंतु जाहिरनाम्यासाठी आयोजित केलेली पत्रकार परिषद कशी घ्यायची अशी अडचन निर्माण झाल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस  पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी यूटर्न घेत आघाडीचा संयुक्त जाहीरनामा जाहिर करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे स्वतंत्रपणे तयार केलेल्या जाहिरनाम्याचे काय करायचे असा प्रश्न राष्ट्रवादीच्या नेत्यांना पडला असून आघाडीच्या जाहिरनाम्यात जनतेसाठी काय सादर करणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.