राष्ट्रप्रेमीची सत्ता हवी की राष्ट्रद्रोही पक्षाची ? - अमित शाह

मुंबई
 22 Sep 2019  370


राष्ट्प्रेमी सत्ता हवी  का? राष्ट्रद्रोही  ?
 * अमित शहांनी  फुंकले भाजपाच्या विधानसभाच्या प्रचारचं रणशिंग 

 

लोकदूत वेबन्यूज टीम 
मुंबई 22 सप्टेंबर 

" तुम्हाला राष्ट्प्रेमी सत्ता हवी  का? राष्ट्रद्रोही  ? ते सांगा.कलम ३७० हटवण्यास विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रद्रोही पक्ष आहेत अशी घनाघाती टिका  केंद्रीय गृहमंत्री तसेच भाजपचे राष्ट्रिय अध्यक्ष अमित शाह यांनी केली. त्याच बरोबर विधानसभा निवडणुकीत भाजपाचं सत्तेत येईल असा विश्वास व्यक्त करत  करुन पुढील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसच राहणार असल्याचे जाहिर केले.

  विधानसभा निवडणूक जाहिर झाली असता दुसऱ्याच दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबई दौरा करीत निवडणुकीचे रणशिंग फुकले. 370 कलम यावर व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी बोलतांना   शाह यांनी राष्ट्रभक्तीच्या  प्रश्नावर राजकारण करू नका, असा टोलाही त्यांनी राहुल गांधी आणि शरद पवार यांना लगाला. 
सर्जिकल स्ट्राइक एअर स्ट्राइक करण्यात आली तेव्हा विरोधी पक्षांनी त्याला विरोध केला. पुरावे मागितले. देशविरोधी घोषणा देणाऱ्या जेएनयूमधील विद्यार्थ्यांसोबत राहुल गांधी उभे राहिले. त्यामुळे आता राष्ट्रवादी भाजपा आणि मित्रपक्षांना साथ द्यायची की परिवारवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांना साथ द्यायची, याचा निर्णय महाराष्ट्रातील जनतेने करावा, असे आवाहन अमित शहा यांनी केले.   यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे निवडणूक भूपेंद्र यादव, सरोज पांडे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, मंत्रिमंडळातील सदस्य आदी उपस्थित होते.

आपल्या भाषणात अमित शाह यांनी कलम ३७० आणि कलम ३५ अ हटवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, ''कलम ३७० हटवण्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला होता. त्यामुळे शरद पवार आणि राहुल गांधी यांनी कलम  ३७० हटवण्यास त्यांचा पाठिंबा आहे की विरोध आहे हे त्यांनी स्पष्ट करावे. राहुल गांधी यांच्या आजी इंदिरा गांधी पंतप्रधान असताना १९७१ च्या युद्धात भारताने पाकिस्तानला नमवले. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांनी कौतुक केले होते.

 १९९४ मध्ये काश्मीरबाबत काँग्रेस सरकारने आणलेल्या प्रस्तावाला भाजपाने पाठिंबा दिला होता. तसेच अटलबिहारी वाजपेयी विरोधी पक्षात असतानाही संयुक्त राष्ट्रांत सरकारचे प्रतिनिधी म्हणून गेले होते, त्यामुळे देशहिताच्या प्रश्नावर राजकारण करू नका.'' असेही आवाहन केले. ''कलम ३७० हा भाजपासाठी राजकीय मुद्दा आहे, असे राहुल गांधी म्हणतात. पण काश्मीर आणि कलम ३७० हा आमच्यासाठी राजकीय मुद्दा नाही. कलम ३७० हटवण्यासाठी आमच्या तीन पिढ्या खपल्या आहेत. अनेकांनी बलिदान दिले आहे. अखंड भारत हेच आमचे लक्ष्य आहे.''  असे सांगत केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी सांगितले.


स्व.मुखर्जी यांची आठवण 

एकच  मिसाल, एक राष्ट्र ध्वज, एक संविधान चा नारा देत भाजप कार्यकर्त्यांनी बलिदान दिले.
श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या बलीदानाची केली आठवण, त्यांनी काश्मीरसाठी  पहिलं बलिदान दिल.

तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 
कश्मिरचे ३७० कलमाने भारत एकसंध व्हावा  अशी  अपेक्षा आहे. अमित शहांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीत अभुतपूर्व यश मिळणार आहे. असे अधोरेखीत केले.