नव्या वाहतूक कायद्याला राज्यात तूर्तास "नो एंट्री "

मुंबई
 11 Sep 2019  146

नव्या मोटार वाहन कायद्याला राज्यात तूर्तास  "नो एंट्री"


*  दंडाची रक्कम कमी करा;परिवहन मंत्र्यांचे केंद्राला पत्र 

लोकदूत वेबन्यूज टीम 
मुंबई 11 सप्टेंबर 

केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याला महाराष्ट्रात तुर्तास "नो एंट्री"करण्यात आली आहे. यामुळे राज्यात कायद्यानुसार वाहन नियम तोडल्यास घोषित नव्या दंडाच्या रक्कमेचा भुर्दंड वाहनचालक अथवा मालकास भरावा लागणार नाही. 
जोपर्यंत राज्य परिवहन विभाग या नवीन कायद्याच्या अंमलबजावणीचे परिपत्रक काढणार नाही तो पर्यंत नव्या कायद्यातील दंडाच्या रकमा वसुल केल्या जाणार नाहीत असे रावते यांनी स्पष्ट केले. 
केंद्र सरकारच्या कायद्यानुसार वाहनांचे नियम तोडल्याल जबरी रकमेची दंड आकारणी करण्यात आली आहे. मात्र या तरतूदींना देशभरातून विरोध होत आहे. नागरिकां मधे प्रचंड संतापाची लाट आहे. त्यामुळे नागरिकांच्या भावना लक्षात घेता या कायद्यातील दंडाच्या रकमेचा फेरविचार करण्याची गरज असल्याचे पत्र दिवाकर रावते यांनी केद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना पाठवले आहे. 
केंद्राच्या उत्तराची प्रतिक्षा करूयात असे स्पष्ट करत तोपर्यंत राज्यात नव्या कायद्याच्या अंमलबजावणी होणार नाही असे रावते यांनी स्पष्ट केले.