कामगार मंत्री डॉ. संजय कुटे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

मुंबई
 03 Sep 2019  283


भविष्यात धुळे सारख्या घटना घटल्यास कठोर कारवाई करणार


कामगार मंत्री डॉ.संजय कुटे यांचा इशारा

लोकदूत वेबन्यूज टीम 
मुंबई 3 सप्टेंबर 


​धुळे जिल्ह्यातील शिरुपूर येथे घडलेली गंभीर घटना पाहता भविष्यात अशा प्रकारच्या घटना राज्यात घडल्यास त्याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करतांना कोणतीही हयगय केली जाणार नाही. अशा इशारा कामगार मंत्री डॉ.संजय कुटे यांनी आज मंत्रालयात घेतलेल्या आढावा बैठकीत दिला.
​शिरपूर येथे शनिवारी गंभीर घटना घडून मोठ्या प्रमाणात जिवित हानी झाली. अशा घटना विकासाच्या प्रगतीवर असलेल्या राज्याला शोभणारे नाही. राज्यात उद्योग आणि कामगार यांत सलोख्याचे संबंध असणे महत्वाचे असून दोन्ही घटकांना योग्य सुरक्षेसंबंधी उपाययोजना करुण घेणे ही 
कामगार विभागाची जबाबदारी आहे. उद्योगांची सुरक्षतेसाठी आवश्यक असलेली उपाययोजना आणि कामगारांच्या सुरक्षतेची काळजी त्या त्या कारखान्यांनी घेतली की नाही  त्याची  तपासणी करणे हे उद्योग निरीक्षकांचे कर्त्तव्य आहे. हे करत असतांना प्रत्येक अतिसंवेदनशिल आणि संवेदनशील कंपन्यांनी योग्य काळजी घेणेबाबत बृहत् आराखडा निश्चित करणे महत्वाचे आहे.
​यामध्ये कामगार विभाग, तसेच औद्यागिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाशी संबंधित अन्य विभागाने समन्वय साधून योग्य कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे मत मंत्री संजय कुटे यांनी आढावा बैठकीत व्यक्त केले.
​औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयातील  रिक्त जागा भरण्याची कार्यवाही केली जाईल  ग्वाही  ना.कुटे यांनी यावेळी दिली. त्याच बरोबर धुळे स्पोटकाच्या चौकशी अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले.
​राज्यात जवळपास 37 हजार कारखाने असून त्यात केमिकल्स संबंधित 4 हजार कारखाने आहेत. त्यात अतिसंवेदनशील 371 कारखाने आहेत. मंगळवारी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत कामगार विभाग  प्रधान सचिव  राजेश कुमार, कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकार यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.