8 सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

महाराष्ट्र
 19 Aug 2019  1097

राज्यातील 8 सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या 

लोकदूत वेबन्यूज टीम

मुंबई 19 ऑगस्ट 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 8 सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहे. यात एक सनदी अधिकारी व केंद्रातून प्रशिक्षण पूर्ण करुण राज्य सेवेत दाखल झालेल्या सात अधिकाऱ्यांचा समावेश आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेतून उचलबांगडी झालेले सनदी अधिकारी विश्वजीत माने यांची म्हाडा व औरंगाबाद येथे केलेल्या  नियुक्तीत बदल करुण आदिवासी विकास संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली. 

केंद्रातील परीविक्षाधीन कालावधी पूर्ण करुण राज्य सेवेत दाखलेल्या सनदी अधिकाऱ्यांत राहुल गुप्ता यांना अहेरी जिल्हा गडचिरोली येथे प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास विभाग आणि सहायक जिल्हाधिकारी गडचिरोली ,वसुमन पंत धरनी जिल्हा अमरावती येथे प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास विभाग व असहायक जिल्हाधिकारी अमरावती, मित्ताली सेठी प्रकल्प अधिकारी व सहायक जिल्हाधिकारी नंदुरबार, मंजू जिंदाल प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास विभाग भामरागढ़ व सहायक जिल्हाधिकारी गडचिरोली, प्रजीत प्रभाररन नायर प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास विभाग जवाहर व सहायक जिल्हाधिकारी पालघर, भाग्यश्री विसपुते प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास विभाग पांढरकवडा व सहायक जिल्हाधिकारी यवतमाळ आणि अविनाश पांडा प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास विभाग चिखलधरा व सहायक जिल्हाधिकारी अमरावती या पदावर नियुक्ती केल्या आहे.