65 तहसीलदार झाले उपजिल्हाधिकारी

महाराष्ट्र
 15 Aug 2019  1063

राज्यातील 65 तहासिलदारांना मिळाली उपजिल्हाधिकारी पदावर पदोन्नती

* 33 सरळसेवेतील निवड झालेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांचीही जेष्ठता निश्चित

लोकदूत वेबन्युज टीम 

मुंबई 15 ऑगस्ट

राज्य सरकारची ध्येय धोरणे तालुका स्तरावरून जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी महत्वाचा दुवा मानल्या जाणाऱ्या महसूल विभागातील 65 तहसीलदारांना राज्य सरकारने उपजिल्हाधिकारी पदावर नियुक्ती दिली आहे. सोबतच लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेल्या 33 उमेदवारांचीही उपजिल्हाधिकारी पदावर निवड करण्यात आली असून या 98 उपजीलाहधिकाऱ्यांचे निवड आदेश जाहीर केले आहे.विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने  पुढील आठवड्यात या 98 उपजिल्ह्यधीकाऱ्याना  जिल्हाठिकाणी नियुक्तीही  देण्यात  येणार  आहे.